नागपूर :- दिनांक १९/०५/२०२३ रोजी शुक्रवार दुपारी ०१.३० वा. नागपूर ग्रामीण जिल्हयातील पोलीस स्टेशन काटोल व नरखेड येथील नूतन पोलीस स्टेशन इमारतीचे तसेच पोलीस स्टेशन कुही, पारशिवनी, खापा येथील नूतन शासकीय निवासस्थाने उद्घाटन सोहळा देवेद्र फडणविस उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते पोलीस स्टेशन काटोल येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रविण दटके, आमदार अभिजीत बजारी, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर आडवले, आमदार अनिल देशमुख, आमदार सुनिल केदार, आमदार समिर मेघे, आमदार आशिष जयस्वाल, आमदार राजु पारवे, आमदार टेकचंद सावरकर व जिल्हा परीषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे हे असुन विशेष उपस्थिती म्हणुन संदिप बिष्णोई (भा.पो.से.) पोलीस महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मर्या, मुंबई, अर्चना त्यागी, भा.पो.से. अपर पोलीस महासंचालक व सह व्यवस्थापकीय संचालक पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळ मर्या. मुंबई, छेरिंग दोरजे, भा.पो.से. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र नागपूर सदर कार्यक्रम यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद (भा.पो.से.) व अपर पोलीस अधीक्षक श्री. डॉ. संदिप पखाले यांनी केलेले असुन सदर कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ:- पोलीस स्टेशन काटोल, नागपूर ग्रामीण नागपूर
वेळ:- दुपारी ०१.३० वा.