नवमहाराष्ट्र, विदर्भ क्रीडा मंडळाची आगेकूच – खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धा 

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील खो-खो स्पर्धेमध्ये नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर संघाने पुरुष गटात आगेकूच केली आहे. नवमहाराष्ट्र संघाने चंदनशेष सावना संघाचा 26-20 अशा फरकाने पराभव करून विजय मिळविला. अन्य सामन्यात विदर्भ क्रीडा मंडळ गडचिरोली संघाने स्लम क्रीडा राळेगाव (30-18) संघाला तर विदर्भ क्रीडा काटोल संघाने ह्युमॅनिटी स्पोर्टिंग परतवाडा (28-08) संघाला आणि विदर्भ क्रीडा नागपूर संघाने विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ नागपूर (24-10) संघाला मात देउन विजय मिळविला. सिटी पोलिस नागपूर संघाने महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (32-24) संघाचा 8 गड्यांनी पराभव केला.

महिलांच्या स्पर्धेत श्रीराम क्रीडा मुसेवाडी संघाने तालुका क्रीडा वरोरा (16-12) संघाचा एक डाव 6 गड्यांनी पराभव करुन स्पर्धेत आगेकूच केली. अन्य सामन्यामध्ये नवक्रांतिज्योत चंद्रपूर संघाने तुळजा भवानी क्रीडा मंडळ परतवाडा (17-16) संघाचा चुरशीच्या सामन्यात एक डाव आणि एका गड्याने पराभव करुन आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. विदर्भ युथ काटोल ने क्रीडा भारती यवतमाळ (39-10) ला एक डाव 29 गड्यांनी मात दिली.

सबज्यूनिअर गटात मुलांच्या स्पर्धेत महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर ने श्रीराम क्रीडा मंडळ मुसेवाडी (24-20) संघाचा तर विदर्भ क्रीडा मंडळ काटोल संघाने विद्यार्थी क्रीडा मंडळ नागपूर (12-10) संघाचा पराभव करुन विजय मिळविला. मुलींच्या स्पर्धेत छत्रपती युवक क्रीडा मंडळ नागपूर संघाने आर. एस मुंडले स्कूल नागपूर (24-2) संघाला नमवून विजय संपादित केला.

खासदार क्रीडा महोत्सव : विदर्भस्तरीय खो खो स्पर्धा 

मानकापूर क्रीडा संकुल 

निकाल पुरुष

1. नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर मात श्री. चंदनशेष सावना (26-20)

नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर एक डाव, 6 गड्यांनी विजयी

2. तुळजाई परतवाडा मात विदर्भ बुनियादी नागपूर (43-12)

तुळजाई परतवाडा एक डाव 31 गड्यांनी विजयी

3. विदर्भ क्रीडा मंडळ गडचिरोली मात स्लम क्रीडा राळेगाव (30-18)

विदर्भ क्रीडा मंडळ गडचिरोली एक डाव 12 गड्यांनी विजयी

4. विदर्भ क्रीडा काटोल मात ह्युमॅनिटी स्पोर्टिंग परतवाडा (28-08)

विदर्भ क्रीडा काटोल एक डाव 20 गड्यांनी विजयी

5. विदर्भ क्रीडा नागपूर मात विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ नागपूर (24-10)

विदर्भ क्रीडा नागपूर एक डाव 14 गड्यांनी विजयी

6. सिटी पोलिस नागपूर मात महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर (32-24)

सिटी पोलिस नागपूर 8 गड्यांनी विजयी

महिला

1. श्रीराम क्रीडा मुसेवाडी मात तालुका क्रीडा वरोरा (16-12)

श्रीराम क्रीडा मुसेवाडी एक डाव 6 गड्यांनी विजयी

2. नवक्रांतिज्योत चंद्रपूर मात तुळजा भवानी क्रीडा मंडळ परतवाडा (17-16)

नवक्रांतिज्योत चंद्रपूर एक डाव एका गड्याने विजयी

3. विदर्भ युथ काटोल मात क्रीडा भारती यवतमाळ (39-10)

विदर्भ युथ काटोल एक डाव 29 गड्यांनी विजयी

14 वर्षाखालील (सबज्यूनिअर) मुले

1. महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर मात श्रीराम क्रीडा मंडळ मुसेवाडी (24-20)

महाराष्ट्र क्रीडा मंडळ 4 गुणांनी विजयी

2. विदर्भ क्रीडा मंडळ काटोल मात विद्यार्थी क्रीडा मंडळ नागपूर (12-10)

विदर्भ क्रीडा मंडळ 2 गुणांनी विजयी

14 वर्षाखालील (सबज्यूनिअर) मुली

1. छत्रपती युवक क्रीडा मंडळ नागपूर मात आर. एस मुंडले स्कूल नागपूर (24-2)

छत्रपती युवक क्रीडा मंडळ 22 गुणांनी विजयी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

Wed Jan 15 , 2025
मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विविध कार्यक्रमांसाठी सकाळी मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माहिती तंत्रज्ञान,व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी स्वागत केले. यावेळी तिन्ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!