नागपूर :- सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाकरीत प्रभाग क्र. 19 मधील अन्नपूर्णा हॉटेल, गांधीबाग ते अमदीप पंजाबी रेस्टारेंट सी. ए. रोड वाहतुकीसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे .
हा आदेश 18 मे 2023 पासून 17 जुलै 2023 पर्यंत अंमलात राहील. महानगर पालिका अधिनियम 1949 चे कलम 236 (1) अन्वये सिमेंट काँक्रीट रोड अन्नपूर्णा हॉटेल गांधीबाग ते अमदीप पंजाबी रेस्टॉरेंट सी.ए. रोड वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी यांनी दिले आहे.
रस्त्यावरील डावी बाजू ही वाहतुकीसाठी बंद करून वाहतूक उजव्या बाजुने वळविण्यात येईल. तसेच डाव्या बाजुचे काम पूर्ण करून उजव्या बाजूस वाहतुक बंद केल्यानंतर रत्याच्या डाव्या बाजूला वळविण्यात येईल. सदर आदेश हा 18 मे ते 17 जुलै 2023 पर्येत लागू राहील. शहर वाहतूक पोलिस विभागने महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 मुंबई अधिनियम (क्रं.2) चे कलम 33 अन्वये वाहतूक नियमाकरीत योग्य कार्यवाही व उपयोजना करावी. या संदर्भात पोलिस विभागाच्या काही सूचना असल्यास त्या दिनांक 24 मे 2023 पूर्वी प्राप्त झाल्यास त्याचा समावेश करावा व कंत्राटदारास सूचना निर्गमित कराव्या, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करावे, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.