रेती चोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

अरोली :- अंतर्गत १० किमी अंतरावर मौजा खरडा शिवार येथे दिनांक १७/०५/२०२३ मे ०६/०० वा. ते ०६/४५ वा. दरम्यान पोलीस स्टेशन अरोली येथील स्टाफ यांना गोपनिय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, एक इसम मौजा खरडा शिवार येथे सुर नदीचे पात्रातून अवैधरीत्या विनापरवाना रेतीची वाहतुक करीत आहे अशा मिळालेल्या माहिती वरून अरोली पोलीस पथक नमुद घटनास्थळी गेले असता आरोपी नामे- संजय भगवान भोयर, वय ३६ वर्ष, रा. बिखडा हा सुर नदीचे पात्रातील विनापरवाना अवैधरीत्या ०१ ब्रास रेती किमती अंदाजे ३०००/-रु चोरून नेतानी मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून निळया रंगाचा ट्रॅक्टर क्र. एम. एच. ४० / सी. ए. ९३४८ किमती अंदाजे ४,००,०००/- रु. व निळ्या रंगाची बिना नंबरची ट्रॉली किमती अंदाजे १,००,०००/- रु. ज्यामध्ये ०१ ब्रास रेती. कि. ३०००रू असा एकुण वाहनासह ५,०३,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी सरतर्फे पोहवा / ११६२ पुडके पोस्टे अरोली यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. अरोली येथे आरोपीविरुद कलम ३७९ भादंवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास स.फी / १३३१ जाधव हे करीत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com