वाडी न.प.ची चेंबर-नाले सफाई युध्द स्तरावर !

– पावसाळ्यापूर्वी समस्या प्रतिबंधाची पूर्वतयारी 

वाडी :- पावसाळ्याच्या दिवसात वाडी न.प.क्षेत्रातील सांडपाणी वाहून जाणारे लहान -मोठे नाले दुथडीभरून वाहत असतात, महापूर आल्यास तेच पाणी रस्त्यावर येऊन परिसरातील घरात, दुकानात शिरून अंतर्गत मार्ग व महामार्गावर पाणी साचल्याने अनेक नागरिकांना व वाहतूक दारांना त्रास सहन करावा लागतो त्याची दखल घेऊन पूर्वनियोजना नुसार नप. चे मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी एक बैठक घेवून आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करून मुख्याधिकारी यांनी सभेमध्ये दिलेल्या निर्देशानुसार वाडी नगर परिषद आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर लहान-मोठे नाले,चेंबर सफाईचे काम जोरात सुरू केल्याचे दिसून येत आहे.

दत्तवाडी,आदर्श नगर,खडगाव चौरस्ता इ. परिसरासह संपुर्ण वाडी शहरात वाहत जाणाऱ्या लहान-मोठया नाल्यामुळे जवळ राहणाऱ्या रहिवास्याना अतिशय त्रास होत असतो,तसेच पावसाळ्यात डेंगू,मलेरिया,कावीळ यासारखे अनेक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो त्यामुळे कुठेही पाणी साचू नये याची खबरदारी म्हणून नाल्याची साफसफाई मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्या नियोजनानुसार आपत्ती व्यवस्थापन समिती कडून ही मोहीम राबविल्या जात आहे, पोकलँड, जेसीबी, व सफाई कामगारांच्या सहाय्याने नाल्यातील पाणी वाहून जाण्यास अडथळा ठरणारे झाडे-झुडुपे तोडून गाळ उपसण्यात येत आहे.जिथे जिथे अंतर्गत रस्त्यावर पाणी साचून वाहतूकिस अडथळा निर्माण होतो तेथील रस्त्यावरील गड्डे बुजवून दुरुस्तीचे काम सुद्धा सुरू आहे. वाडी न.प. च्या जल व मल निस्सारण अभियंता सुषमा भालेकर स्वच्छता निरीक्षक मुकेश माहातो,धनंजय गोतमारे यांच्या देखरेखीखाली लवकरात लवकर नाले सफाई, रस्ते दुरुस्ती करून या पावसाळ्यात वाडी नगरवासीयांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेत आहे. पावसाळ्यात अनेक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने नागरीकांनी सुद्धा आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी घरातील कचरा नाल्यामंध्ये न टाकता घंटा गाडीतच टाकून, वाडी शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी न.प.ला सहकार्य करण्याचे आवाहन वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी केले आहे.

NewsToday24x7

Next Post

अजमेर पुरी एक्सप्रेसमधून दागिने लंपास

Fri May 19 , 2023
– अकोला ते नागपूर प्रवासादरम्यान घटना -पावनेदोन लाखांच्या मंगळसुत्रासह सोनसाखळी आणि रोख चोरी नागपूर :-अकोला ते नागपूर प्रवासादरम्यान अज्ञात चोराने हॅण्ड बॅगमधून पावनेदोन लाखांच्या मंगळसुत्रासह सोनसाखळी आणि रोख चोरून नेली. ही घटना अजमेर-पुरी एक्सप्रेसमध्ये घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हिना पिंपळकर, रा. अयोध्यानगर असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. हिना त्यांच्या दोन मुलांसह कौटुंबिक समारंभासाठी अकोला येथे गेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com