रामटेक साहसी व वारसा पर्यटन महोत्सवाचा थाटात शुभारंभ

नागपूर : दोन दिवसीय रामटेक साहसी व वारसा पर्यटन महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी आर.विमला यांच्या हस्ते रामसागर बॅक्वाटर कपूरबावडी परिसर रामटेक येथे  आज करण्यात आले. आमदार आशिष जयस्वाल, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवाई,लोकप्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.

            आज सकाळी 6 ते 7 वाजता लेक साइड ट्रेक व पक्षी निरीक्षण करण्यात आले. 7 ते 9.30 वाजता ओपन वॉटर स्विमींग स्पर्धा, ट्रॅक्टर व बैलगाडी राईड, साहसी उपक्रम, सकाळी 8 ते 10 वाजेदरम्यान चित्रकला आणि फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली. पारंपारीक वेषभूषा व आखाडा प्रात्यक्षिके, बचत गट दालन उदघाटन व मार्गदर्शन, ॲडव्हाटेज रामटेक व रामटेक कृषी पर्यटन या विषयांवर चर्चासत्र,  साहसी उपक्रम, हेरिटेज ट्रेक, आकाश निरिक्षण, लेक साईड कॅम्प तसे सांस्कृतिक कार्यक्रम असे रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन आज पहिल्या दिवशी घेण्यात आले. नागरिकांनी या महोत्सवात मोठया संख्येने सहभाग नोंदविला.

            20 मार्च रोजी स्वच्छता अभियानांतर्गत हेरिटेज ट्रेक, रामटेक सायकल परिक्रमा, साहसी उपक्रम, चित्रकला व फोटोग्राफी प्रदर्शन, पारंपारिक वेषभूषा, चर्चासत्र, रामटेक वारसा स्थळांचे दर्शन आदी कार्यक्रम होणार आहे.

            दुपारी 4 ते 5 वाजता या महोत्सवाचा समारोप होणार असून या महोत्सवात सहभागी स्पर्धकांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

२१ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान पोषण पखवाडा

Sun Mar 20 , 2022
दोन आठवडे विविध स्पर्धा व जनजागृती अभियान नागपूर : केंद्र शासन, महिला व बाल विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार २१ मार्च ते ४ एप्रील २०२२ पर्यंत नागपूरसह संपूर्ण देशात पोषण पखवाडाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण व आढावा समिती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर अभियान यशस्वी करण्याचे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com