निवडणुकीदरम्यान दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी राष्ट्रीय प्रादेशिक पक्षांना डिजिटल टाइम व्हाउचर जारी करणार – भारत निवडणूक आयोग

नवी दिल्ली :- निवडणुकीदरम्यान आकाशवाणी आणि दूरदर्शनवर राजकीय पक्षांना दिले जाणारे वेळ आता ऑनलाइन होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने, राजकीय पक्षांद्वारे सरकारी मालकीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या वापरासाठी विद्यमान योजनेत सुधारणा केली आहे. माहिती तंत्रज्ञान (IT) प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल टाइम व्हाउचर जारी करण्याची तरतूद सादर करून हे केले गेले आहे. या सुविधेमुळे, राजकीय पक्षांना निवडणुकीदरम्यान वेळेचे व्हाउचर मिळवण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी ECI/CEO कार्यालयात पाठवण्याची आवश्यकता भासणार नाही. निवडणूक प्रक्रियेच्या सुधारणा, सर्व भागधारकांच्या सुलभतेसाठी, तसेच तंत्रज्ञानाची सुविधा घेण्यासाठी आयोगाने महत्वाचे पाऊल उचलेले आहे.

तंत्रज्ञानातील प्रगती ओळखुन आयोग राजकीय पक्षांशी संवाद साधण्यासाठी आयटी आधारित पर्याय उपलब्ध करून देत आहे. अलीकडेच, आयोगाने निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांकडून आर्थिक खाती ऑनलाइन भरण्यासाठी एक वेब पोर्टलही सुरू केले आहे.

सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक ला भेट द्यावी.

ऑर्डरची लिंक:

https://eci.gov.in/files/file/15138-scheme-for-use-of-govt-owned-electronic-media-by-political-parties-during-elections-modification-of-scheme-%E2%80%93-para-6-sub-clause-iv-%E2%80%93-provision-to-provide-time-vouchers-through-it-platform-%E2%80%93-regarding/

राष्ट्रीय/प्रादेशिक राजकीय पक्षांना पाठवलेल्या पत्राची लिंक:

https://eci.gov.in/files/file/15140-letter-to-political-parties-digitization-of-time-vouchers-in-respect-of-broadcasttelecast-time-allotted-to-nationalstate-political-parties-during-election/

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेंट जेनेली शाळेतील 9 व्या वर्गातील विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यु

Wed Jul 19 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू येरखेडा रहिवासी व सेंट जेनेली शाळेत 9 व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी हा आपल्या आईसोबत औषधी दुकानातून औषध घेत असता अचानक भोवळ येऊन पायऱ्यावरून खाली पडल्याने डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीने नागपूर च्या किंगस्वे रुग्णालयात उपचार घेत असता उपचारादरम्यान या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com