३,६३,९४८ इतकी रक्कम थकीत चंद्रपूर : – चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे कांजी व्यापार संकुल मार्केट येथील स्वरूप मंगल प्रसाद मिश्रा यांचे गाळा क्र.४ ए १०३८ सील करण्यात आले आहे . चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे. दिनांक २४/०१/२०२३ रोजी मनपाच्या […]
Marathi News
नागपूर : नागपूरातून वाहणारी एकमेव नदी म्हणजे नाग नदीला एक ऐतिहासिक वर्णन लाभलेली नदी नागवंशीय काळात नाग नदीवर यात्रा भरत वेगवेगळ्या प्रांतातून येथे वेगवेगळे व्यापारी वर्ग येत तसेच वेगवेगळे आयोजन येथे होत असे यशवंत स्टेडियम जवळील संगम प्रसिद्ध होता पण आज ही नदी दूषित झाली आहे वेगवेगळ्या सांडपाण्याच्या नाल्या याला जोडण्यात आलेल्या आहे भारत सरकार तर्फे नदी स्वच्छता अभियान घेण्यात […]
नागपूर : ‘हर घर जल से नल’ या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर व्यापक प्रचार, प्रसिध्दीचे काम सुरू आहे. त्याअनुषंगाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये जल जीवन मिशन संदर्भात कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले. जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी 26 जानेवारीच्या ग्रामसभा यशस्वी पार पाडाव्यात व ग्रामस्थांमध्ये […]
– असामाजिक तत्वाविरूद्ध रेल्वेची विशेष मोहीम – नागपूर, कळमना, कामठी परीसरात खोडसरपणा – पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद नागपूर :- अत्याधुनिक आणि स्वदेशी वंदे भारत एक्सप्रेसह इतरही रेल्वे गाड्यांवर दगडफेक केली जाते. अलिकडेच अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. असामाजिकतत्वांकडून असा खोडसर पणा केला जात आहे. मात्र, त्यांच्या आनंदात दुसर्यांचा जीव धोक्यात येतो. शिवाय रेल्वे संपत्तीचेही नुकसान होत आहे. दगडफेकीच्या वाढत्या घटनांवर […]
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवारी (24) रोजी शोध पथकाने 121 प्रकरणांची नोंद करून 65600 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]
शिवसेना-वंबआ युती केवळ दोन नातवंडांपूर्तीच नागपूर :- राज्यातील राजकारणात नव्याने उदयाला आलेल्या शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीचा बहुजन समाजावर कुठलाही प्रभाव पडणार नाही.महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरेंचे नातू यांच्यात विद्यमान राजकीय स्थितीमुळे झालेली ही युती आहे.वैचारिक आंदोलनाला या युतीत कुठेही स्थान नाही,असे स्पष्ट मत बहुजन समाज पार्टी चे अध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी बुधवारी व्यक्त केले. २०१९ पूर्वी भारिप बहुजन […]
नागपूर : क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लोकसहभागाशिवाय पर्याय नाही. लोकसहभागातून क्षयरोग जिल्हा मुक्त करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. क्षयरोग विभागाच्या योजनांच्या आढाव्यासंदर्भातील बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॅा. ममता सोनसरे, डॅा. हर्षा मेश्राम यांच्यासह समितीचे सदस्य व वैद्यकीय […]
नागपूर : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी रोजी राज्यासह देशभरामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. नागरिकांमध्ये मतदान नोंदणी तसेच मतदानाच्या महत्त्वासंदर्भात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाचा नागपूर जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम 25 जानेवारीला दुपारी 2 ते 3 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य […]
पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण नागपूर : येथील कस्तुरचंद पार्क येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन शासकीय कार्यक्रमाची आज रंगीत तालीम घेण्यात आली. उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण होणार आहे. रंगीत तालमीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी […]
भारतात सशक्त, स्वदेशी आणि स्वावलंबी डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला साकार करण्याच्या दिशेने ‘‘BharOS’’ हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान नवी दिल्ली :- केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय रेल्वे, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह आज ‘‘BharOS’’ या आयआयटी मद्रास या […]
नागपूर : खसरा क्रमांक ४९, मौजा-चिखली (देवस्थान) तुलसीनगर, शांतीनगर येथील गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या जागेवर अतिक्रमणाचे प्रकरण समोर आले आहे. सोबतच नागपूर सुधार प्रन्यास प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीचे लक्तरे देखील वेशीवर टांगली गेली आहेत. २०१४ मध्ये ही भूखंड नियमित करण्यास नकार देणाऱ्या नासुप्रने २०१९ मध्ये मात्र ते नियमित केले आहे. पंतप्रधान आवास योजना खसरा क्रमांक ४९, मौजा-चिखली (देवस्थान) तुलसीनगर, शांतीनगर, […]
नागपुर :- कृषी वीजवाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी लागणारी जमिन प्रति वर्ष ७५ हजार रु प्रति हेक्टर या दराने भाडेतत्वावर महावितरणद्वारे घेण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील महावितरणच्या ४१ उपकेंद्रा पासून ५ किलोमीटर पर्यंतच्या तसेच रस्त्यालगतच्या जमिनीची महावितरणला गरज असून त्यासाठी संपर्क करून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. राज्यातील […]
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.24) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]
नागपूर:- राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. मुले व युवकांनी, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि समस्त नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा, असे आवाहन जयंत पाठक, यांनी आज केले. राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सन्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान “कामयाब फाऊंडेशन” द्वारा आयोजित आणि “नाग स्वराज फाऊंडेशन” व “अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर” यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करा सन्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान पोस्टरचे विमोचन […]
नागपूर : कोरोना महामारीत पालक गमावलेल्या मुलांना व विधवा महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण द्या, स्टार्टअप प्रोग्रामद्वारे त्यांना रोजगार मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केल्या. जिल्हा कृती दल, बालकल्याण समिती व मिशन वात्सल्य योजनेबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. चाईल्ड लाईन समितीचे संचालक केशव वाळके, बालकल्याण मंडळाच्या अध्यक्ष छाया राऊत, जिल्हा […]
नागपूर : बालविवाह प्रथा नष्ट करण्यासाठी शाळेत नियमित शपथ घेण्यात यावी. यामुळे बालमनावर संस्कार होऊन बालविवाह योग्य नाही, हे मुलांना कळेल. त्यासोबतच बसस्थानक व मोक्याच्या ठिकाणी याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यांनी दिल्या. चाईल्ड लाईन सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. चाईल्ड लाईन समितीचे संचालक केशव वाळके, जिल्हा […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- मागील 66 वर्षांपासून भोवरी गावात आयोजित करण्यात येणाऱ्या कबड्डी स्पर्धाची परंपरा कायम ठेवत यावर्षीसुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या पाश्वरभूमीवर कामठी तालुक्यातील भोवरी गावात जय हनुमान व्यायाम शाळा सेवा मंडळ भोवरीच्या वतीने 25 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता जय हनुमान व्यायाम शाळा भोवरी येथें भव्य कबड्डी स्पर्धा तसेच 26 जानेवारीला कुस्तीची आम दंगल आयोजित करण्यात आले आहे तेव्हा […]
एमपीएससीच्या नियमामुळे पत्रकारितेच्या पदव्यांवरच प्रश्नचिन्ह नागपूर :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काही दिवसांपूर्वी काढलेल्या माहिती व जनसंपर्क विभागांच्या पदभरत्यांसाठी शैक्षणिक पात्रतेची नवी नियमावली पुढे आणली आहे. आयोगाच्या या नियमावलीनुसार पत्रकारितेमध्ये पदवी किंवा पदविका अर्थात डिप्लोमा घेतलेले पात्र आहेत तर त्यापेक्षा वरचे शिक्षण म्हणजे पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी (एम.ए.जनसंवाद) घेतलेले उमेदवार मात्र अपात्र ठरले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये विविध पदांसाठी […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 24 :- आंतरजातीय प्रेम प्रकरणाच्या वादातून स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामगढ येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन प्रियकरासह प्रियेसीच्या नातेवाईकावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना गतरात्री घडली . अल्पवयीन प्रियेसीच्या तक्रारीवरून 17 वर्षीय प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला तर फिर्यादी अल्पवयीन प्रियकराच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा आरोपीमधील […]
मतदार दिनी प्रमाणपत्राद्वारे होणार सन्मानित चंद्रपूर – २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महानगरपालिका क्षेत्रातील विविध महाविद्यालयांत रांगोळी, वादविवाद इत्यादी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सरदार पटेल महाविद्यालय, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, जनता महाविद्यालय,एफ.ई.एस गर्ल्स महाविद्यालय,राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज,साई पॉलीटेक्नीक,खत्री महाविद्यालय, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, जैनुद्दीन जव्हेरी पॉलिटेक्नीक, शासकीय आय.टी.आय इत्यादी महाविद्यालयांत विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाने […]