तिरंगा जनजागृती अभियान पोस्टरचे विमोचन, राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी नागपुरात जनजागृती अभियान

नागपूर:- राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. मुले व युवकांनी, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि समस्त नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा, असे आवाहन जयंत पाठक, यांनी आज केले.

राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सन्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान “कामयाब फाऊंडेशन” द्वारा आयोजित आणि “नाग स्वराज फाऊंडेशन” व “अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर” यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करा सन्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान पोस्टरचे विमोचन जयंत पाठक (विभागीय संचालक-अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर) यांच्या हस्ते आज करण्यात आले.

कामयाब फाऊंडेशन या सामाजिक संस्थेद्वारा वर्ष2010 पासून राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सन्मान तिरंग्याचा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियांनाद्वारे कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज(तिरंगा) उचलण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. नागपूर शहरातील उद्याने, शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणावरील जीर्ण अवस्थेतील पडलेले, फाटलेले, कुजलेले कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज(तिरंगा) उचलते. 26 जानेवारी व 15 ऑगष्ट या राष्ट्रीय सणाच्या दिवशी लहान मुले, युवक-युवती मोठ्या उत्साहाने राष्ट्रीय ध्वज‘तिरंगा’ घेवून फिरतात व खराब,फाटलेकी ते कुठेही फेकून देतात यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. असे होवू नये म्हणून कामयाब फाऊंडेशनचे कार्यकर्ते राष्ट्रीय ध्वज उचलून सांभाळण्याचे कार्य करीत आहेत. हा उपक्रम चांगला असल्याचेही जयंत पाठक यावेळी म्हणाले.

दि. 23 ते 27 जानेवारी 2023 या कालावधीत जनजागृती अभियान सुरु राहणार आहे. या अभियानाच्या दरम्यान शाळा, महाविदयालयामध्ये स्टीकर, पोस्टर वितरण करुन तिरंगाची विषयाची माहिती व नियमाची देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

या विमोचन कार्यक्रमात कामयाब फाऊंडेशनचे अध्यक्ष हितेश डोर्लीकर, निशा व्यवहारे, डॉ.मंजिरी जावडेकर, सुशिल यादव, हेमंत पराते, विनिता बोंद्रे, हर्षा डोर्लीकर, यज्ञेश कपले, शुभम राठौड़, विपुल चौधरी, रोहित पाटील, तुषार गावड़े प्रतीक्षा खोतपाल व इतर युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

● राष्ट्रध्वजाचा अवमान टाळा !

●प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरू नका !

●पताका म्हणून राष्ट्रध्वज वापरू नका !

●तिरंग्याच्या रंगाचे पतंग उडवू नका !

●राष्ट्रध्वज छापलेले कपडे घालू नका !

●तिरंग्याच्या प्रतिकृतीचे केक कापू नका !

●राष्ट्रीय अस्मितेच्या रक्षणार्थ या कार्यात सहभागी व्हावे..!!

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com