भविष्यातील नागनदी @ 2047

नागपूर : नागपूरातून वाहणारी एकमेव नदी म्हणजे नाग नदीला एक ऐतिहासिक वर्णन लाभलेली नदी नागवंशीय काळात नाग नदीवर यात्रा भरत वेगवेगळ्या प्रांतातून येथे वेगवेगळे व्यापारी वर्ग येत तसेच वेगवेगळे आयोजन येथे होत असे यशवंत स्टेडियम जवळील संगम प्रसिद्ध होता पण आज ही नदी दूषित झाली आहे वेगवेगळ्या सांडपाण्याच्या नाल्या याला जोडण्यात आलेल्या आहे भारत सरकार तर्फे नदी स्वच्छता अभियान घेण्यात आले आहे या निमित्त नागपूर आर्ट सोसायटीच्या रंग मल्हार चित्रकारांनी नाग नदी 2047 कशी दिसावी या उद्देशाने 3×16 फूट कॅनव्हासवर चित्रण केले आहे यात नाग नदीच्या उगम स्थानापासून तर भांडेवाडी पर्यंतच्या भागाचे चित्रण केले असून त्यात नाग नदीत बोटिंग, स्विमिंग, सी प्लेन असून नदीच्या पाण्यावर वीज निर्मिती करून ती शहराला मिळावी इतकेच नाही तर ती पर्यटकांना पर्यटकांसाठी ही सौंदर्य प्रधान व्हावे व युवकांना रोजगार मिळण्याच्या उद्देशाने कॅनव्हास वर रंगयोजना करण्यात आली आहे नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेत रंग मल्हारच्या चित्रकारांनी ही संकल्पना त्यांना रंगविली आहे या चित्रकारांमध्ये श्रीकांत गडकरी, किशोर सोनटक्के, दीपक सातपुते, राजकुमार कावळे, आशिष पलेरिया, हरीश ढोबळे यांनी चितारलेले आहे ही भव्य कलाकृती नितीन गडकरी यांना देण्यात आली असून ही कलाकृती कविवर्य सुरेश भट सभागृह येथे लावण्यात येणार आहे या कार्यक्रमात ईश्वर धिरडे, गोपाल लांजेवार चित्रकार श्रीकांत गडकरी, किशोर सोनटक्के, दीपक सातपुते, राजकुमार कावळे, प्रकाश जिल्हारे ,हरीश ढोबळे ,श्रीश सोनटक्के, गौरव सुरदसे, व आशिष पलोरिया उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com