तीन लाख रुपये थकीत असणाऱ्या थकबाकीदाराचे गाळे सील

३,६३,९४८ इतकी रक्कम थकीत

चंद्रपूर : – चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे कांजी व्यापार संकुल मार्केट येथील स्वरूप मंगल प्रसाद मिश्रा यांचे गाळा क्र.४ ए १०३८ सील करण्यात आले आहे .

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे. दिनांक २४/०१/२०२३ रोजी मनपाच्या कर वसुली व जप्ती पथकाद्वारे कांजी व्यापार संकुल मार्केट येथील गाळे सील करण्यात आले

गाळा क्र.४ ए १०३८ गाळेधारक स्वरूप मंगल प्रसाद मिश्रा यांच्याकडे रुपये एकुण ३,६३,९४८ इतकी रक्कम भाडे स्वरूपात थकीत असल्याने तसेच मालमत्ता धारकाने कर भरणा करण्यासंदर्भात नकारात्मक प्रतिसाद दिल्याने कर वसुली व जप्ती पथकाने मालमत्ता धारकाचे दुकान सील केले. या गाळ्यावर मालमत्ता कर व अन्य कर थकीत आहे.

सदर कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात कर विभाग प्रमुख अनिल घुले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात मालमत्ता कर पथकाने केली.

 

NewsToday24x7

Next Post

कलंबी गांव में सात दिवसीय श्रीपाद भगवद सप्ताह उत्साह के साथ मनाया

Wed Jan 25 , 2023
सौरभ पाटील, प्रतिनिधी   वाडी :- कलंबी गांव में सात दिवसीय श्रीपाद भगवद सप्ताह एवं राम कथा वाचन कार्यक्रम का आयोजन उत्साह के साथ किया गया. सप्ताह मंगलवार 17 जनवरी से शुरू हुई थी। कलंबी गांव के हनुमान मंदिर क्षेत्र के मंडप में महाराज अजर्न  गिरड़कर (तारसा) व महाराज भीमसेन गिरड़कर व विजय बालपांडे महाराज के माध्यम से प्रतिदिन रामकथा का […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com