आंतरराजातीय प्रेम प्रकरणाच्या वादात अल्पवयीन प्रियकरासह अल्पवयीन प्रियेसीच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 24 :- आंतरजातीय प्रेम प्रकरणाच्या वादातून स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामगढ येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन प्रियकरासह प्रियेसीच्या नातेवाईकावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना गतरात्री घडली .

अल्पवयीन प्रियेसीच्या तक्रारीवरून 17 वर्षीय प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला तर फिर्यादी अल्पवयीन प्रियकराच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा आरोपीमधील तीन आरोपी अटक आहेत तर तीन महिला आरोपीना सुचनापत्र देऊन सोडण्यात आले.अटक आरोपीमध्ये ताज अब्दुल गफ्फार शेख वय 55 वर्षे रा कामगार नगर कामठी,इकबाल शेख अब्दुल कादर वय 35 वर्षे व अनवर शेख अब्दुल कादर वय 30 वर्षे रा रमानगर कामठी असे आहे तर सुचनापत्र देऊन सोडलेल्या महिला आरोपीमध्ये सुलताना परवीन अनवर शेख,शबाना शेख इकबाल शेख वय 30 वर्षे दोन्ही रा रमानगर कामठी तसेच खैरूंनीसा ताज अब्दुल गफ्फार शेख वय 45 वर्षे रा कामगार नगर कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपी 17 वर्षीय प्रियकर हा रामगढ रहिवासी व 17 वर्षोय प्रियेसी ही कामगार नगर रहिवासी असून दोघेही पोरवाल कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत.दोघात असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे प्रेमात रूपांतरित होऊन जीवन जगण्याचा मरण्याच्या आकाभाका खाऊ लागले या दोघांच्या प्रेमाची कुणकुण घरमंडळीना लागताच दोघेही घरमंडळींनी दोघांची समजूत काढून समज दिली.मात्र प्रेमाच्या आहारी गेलेल्या या दोघांना कुठलेही अभय नसल्याने प्रेम हाच जीवनाचा शेवट अशी धारणा करून भेटीगाठी सुरू होत्या.हीच भेट काल दुपारी साडे तीन दरम्यान रामगढ परिसरात झाली असता मुलीच्या वडिलाला दिसताच मुलीच्या वडिलाने या अल्पवयीन तरुणाला मारझोड करून मुलीला घरी सोडले. मुलीच्या घरमंडळीचा राग इतक्यातच शांत होत नाही तोच प्रियेसीच्या आई वडील ,दोन मामा,मामी ने त्या मुलाला गाडीवर बसवून गणेश ले आउट ला नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरी नेऊन दोरीने बांधून दगडाने मारझोड करून जख्मि करीत बेशुद्ध अवस्थेत सायंकाळी 5 .30वाजता रविदास नगर जवळील मोकळ्या जागेतील झुडपात सोडून दिले.तर बराच वेळ होऊनही मुलगा घरी न आल्याने मुलाच्या आईने चिंता व्यक्त करीत पोलीस स्टेशन गाठून मुलीच्या घर मंडळी विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शोध मोहिमेला गती दिली.श्वान पथक द्वारे शोध घेतला मात्र कुठेही थांगपत्ता लागत नव्हता .एकीकडे आंतरजातोय वादाचे तीव्र पडसाद न उंमटावे वा कुठलीही अनुचित घटना पुढे न यावी या हेतूने पोलिसांनी पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनार्थ एपीआय नरवाडे,पीएसआय वारंगे आदींनी शोधकार्याला गती दिली मात्र शोध काही लागेना रात्रभर शोध घेऊनही शोध लागेना …तर सदर मुलाला जाग येताच रात्री 3 दरम्यान मुलगा घरी परतल्याने घरमंडळींसह पोलिसांनी मोकळा श्वास घेतला.तर दोन्ही कुटुंबियांच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय नरवाडे ,पोलीस उपनिरीक्षक रासकर करीत आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com