कोळशाच्या व्यापारात पोलिसांचेही हात काळे? कामठी तालुक्यात सुरू असलेल्या कोळसा व्यवसायिकांना आशीर्वाद कुणाचा?

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– भविष्यात टोळीयुद्धाचा भडका शक्य

कामठी :- विद्युत प्रकल्पांमध्ये कायमच निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा पुरवठा होत असल्याची ओरड केली जाते. मात्र, या समस्येच्या मूळापर्यंत कोणीही पोहोचू इच्छित नाही. त्याला कारणीभूत आहे तो कोळशाचा काळा धंदा. हा काळा धंदा कामठी तालुक्यात सर्रास सुरू असून त्यातून भविष्यात टोळीयुद्ध पेटण्याची शक्यता आहे.कामठी तालुक्यात काही अधिकृत कोल डेपो आहेत तर काही अवैध कोळसा व्यवसायिकांनी संबंधित पोलिसांशी संगनमत करून अर्थचक्र फिरवून ‘तेरी भि चूप मेरी भि चूप’ही धारणा साकारत बिनधास्तपणे अवैध कोल डेपो उभारून कोळसा व्यवसाय करीत आहेत.तर या अवैध कोल डेपो वर दररोज दुचाकी तसेच शक्य त्या वाहनाने कोळसा आणून विक्री करण्याचा काळा धंदा जोमात सुरू आहे.या अवैध कोळसा व्यवसायिकावर आशीर्वाद कुणाचा?याचे उत्तर अजूनही अनुत्तरित आहे.

विदर्भात अनेक ठिकाणी कोळसा खाणी आहेत. त्यामुळे औष्णिक विद्युत प्रकल्पही विदर्भातच सर्वाधिक आहे. खाणींमधून कोळसा काढण्याचे काम वेकोलीमार्फत केले जाते.वॉशरीत स्वच्छ केल्यानंतर तो औष्णिक विद्युत प्रकल्प, खासगी उर्जा निर्मिती प्रकल्प आणि छोटय़ा मोठय़ा लघु उद्योजकांना पुरवण्यात येतो. विद्युत प्रकल्पांना पुरवण्यात येणारा कोळसा निकृष्ट दर्जाचा असल्याची कायमचीच ओरड असते. त्यामुळे आता राज्यात विदेशातील कोळशाची आयात करण्यात येते.दरम्यान विद्युत प्रकल्पांना निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवठय़ामागे कोळसा चोरी हे प्रमुख कारण आहे. चोरांवर राजकीय पुढारी व पोलिसांचा नेहमीच वरदहस्त राहतो. नागपूरजवळील कामठी शहर हे कोळसा चोरीचे प्रमुख केंद्र आहे. कन्हान वेकोली मधून दररोज आणणारा चोरीचा कोळसा हा कामठी तालुक्यात अवैधरित्या सुरू असलेल्या कोळसा डेपो मध्ये बिनधास्तपणे विक्री करतात.याकडे स्थानिक पोलीस मिळत असलेल्या चिरीमिरीमुळे अक्षम्य दुर्लक्ष पुरवीत आहे.सध्या कामठी तालुक्यात अवैधरित्या कोळसा व्यापार सुरू असून या व्यवसायातून पोलिसांना मोठी देण जात असल्यामुळे तेथील कोळसा चोरांवर कारवाई होत नाही. मात्र, पोलीस आयुक्त अमितेशकुमार हे कोळसा चोरांना वेसण घालतील का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

– व्यवसाय असा चालतो

परिसरातील कन्हान वेकोली कोळसा खाणींमधून निघणारा कोळसा हा विद्युत प्रकल्पांना मालमोटारींद्वारे पाठवला जातो. दिवसरात्र वाहतूक सुरू असते. कोळसा चोर हे ट्रकचालकांच्या संगनमताने रात्री विद्युत केंद्रात कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून २० ते २५ किलो कोळसा एका ट्रकमधून काढतात. तसेच दुचाकीने कोळसा चोरी करून आणून तो चोरीचा कोळसा कामठी तालुक्यातील अवैध कोल डेपोत जमा करतात, एका रात्री जवळपास २ ते ३ ट्रक कोळसा जमा होत असल्याची माहिती आहे. त्याची बाजारात किंमत बाजारात 40 ते 50 हजार रुपये आहे. ट्रकमधील काढलेला कोळशाचे बिंग फुटू नये म्हणून ट्रकचालक हे ट्रकमधील शिल्लक कोळशावर पाणी शिंपतात. या काळया धंद्यात स्थानिक पोलिसांचेही हात काळे असल्याने चोरांवर कारवाई होत नसल्याची माहिती आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनधिकृत ले आऊट वरील बांधकामावर मनपाची कारवाई

Fri Nov 3 , 2023
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत ले आऊट वरील बांधकामावर कारवाई करण्यात आली असुन अनधिकृत रीतीने उभे करण्यात आलेले मार्कींगचे सिमेंट खांब तोडण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली आहे. ठक्कर कॉलनी येथे ईरई नदी पात्राजवळ मौजा गोविंदपुर रीठ सर्वे नंबर ७३/१ असलेल्या भूखंडावर अनधिकृत ले आउट टाकुन प्लॉट विक्रीचा व्यवसाय सुरू केला असल्याची माहीती मनपा पथकास मिळाली होती. त्यानुसार पाहणी केली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com