नागपूर :- दिनांक ३१/०५/२०२४ रोजी नागपूर (ग्रामीण), पोलीस दलातुन सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर (ग्रामीण), येथे निरोप देण्याकरीता आमंत्रित करण्यात आले. यावेळी एका ‘निरोप समांरभाच्या” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सेवानिवृत्त होणाऱ्या १) ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जानुसिंग जाधव पोस्टे वेलतूर २) ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बन्सोड पोस्टे कुही ३) सफौ. सुरेंद्रसिंग ठाकुर पोलीस नियंत्रण कक्ष नागपूर ग्रामीण ४) सफौ प्रकाश उईके पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेटवस्तु देवून निरोप देण्यात आला आहे. तसेच सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी अंमलदारांना पोलीस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी त्यांना पुढील आयुष्य सुख समृध्दीचे व आरोग्य संपन्न राहावे अश्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), मा. अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, पोलीस उप अधिक्षक (गृह) विजय माहुलकर व इतर कार्यालयीन स्टाफ हजर होते.