विधिमंडळ कामकाजाबाबत मंत्रालयात सोमवारी कार्यशाळा

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘माध्यम साक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार तसेच महासंचालनालयातील अधिकारी यांच्याकरिता ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सोमवारी ३ जून रोजी मंत्रालयातील वार्ताहर कक्षात करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधिमंडळ सचिवालयाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे, विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव जितेंद्र भोळे हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात विधिमंडळाची कार्यपद्धती आणि संकल्पना या विषयावर प्रधान सचिव जितेंद्र भोळे, द्वितीय सत्रात विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन, चर्चा आणि विशेषाधिकार या विषयावर निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे तर तृतीय सत्रात विधिमंडळ कामकाजात आमदारांची भूमिका, विधिमंडळ समिती कामकाज व दस्तऐवज या विषयावर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मार्गदर्शन करतील.

विधिमंडळ अधिवेशन कामकाजाचे वार्तांकन करताना माध्यम प्रतिनिधी व माहिती व जनसंपर्कचे अधिकारी यांना ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरेल, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी नमूद केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

CHANGE OF COMMAND:AIR MARSHAL VIJAY KUMAR GARG, AVSM, VSM ASSUMED THE APPOINTMENT OF AIR OFFICER COMMANDING-IN-CHIEF, MAINTENANCE COMMAND

Sat Jun 1 , 2024
Nagpur :- Air Marshal Vijay Kumar Garg AVSM, VSM assumed the appointment of Air Officer Commanding-in-Chief, Maintenance Command on 01 Jun 2024. He was commissioned in the Aeronautical Engineering (Mechanical) branch of Indian Air Force on 19 Aug 1986. The Air Officer graduated from Regional Engineering College, Bhopal in Mechanical Engineering. He did his M. Tech in Aerospace Engineering from […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com