अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपींविरूद्ध गुन्हा नोंद पोलीस स्टेशन खापरखेडा ची कारवाई

खापरखेडा :- पोलीस स्टेशन खापरखेडा येथील स्टाफ पोस्टे परीसरात पेट्रोलींग करीत असता आरोपी क्र. १) रजत उर्फ सतीश जनार्धन इंगोले, रा. डोरली ता. पारशिवनी खापरखेडा व आरोपी क्र. २) विनोद गणपत मोजे, रा. वार्ड नं ३ दहेगाव हे दिनांक ३१/५/२४ चे ०३/२० वा. चे दरम्यान पारशिवनी टि पॉईट भानेगांव येथे कोणताही परवाना नसतांना अवैदयरित्या उत्खनन करुन ४ ब्रास रेती किंमती अंदाजे १६०००/- रु ची वाहतुक करतांना मिळुन आल्याने एकुन १,१६,०००/- रु चा मुददेमाल जप्त करुन आरोपीतांविरूद्ध कलम ३७९, १०९ भादंवी सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमिन महसुल साहिता १९६६, सहकलम ४/२१ खान खनिज अधि १९५७ सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधि, १९८४ अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे खापरखेडा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांचे नेतृत्वात त्यांचा स्टाफ यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डीझेल चोरी करणारे आरोपी अटकेत

Sat Jun 1 , 2024
नागपूर :- फिर्यादी ईश्वर वामनराव भोकसे, वय ३८ वर्ष, रा. कोहली ता. कळमेश्वर जि. नागपूर याने आपले शेतात बांधलेले दोन रुम मध्ये ठेवलेले गाई ढोरे करीता ११ ठेपाचे बॅग किंमती १४,०००/- रू. व ट्रॅक्टर मध्ये टाकण्या करीता तिन कैन मध्ये ठेवलेले ६० लिटर डिझल किंमती ६०००/- रू. असे एकूण २०,०००/- रु. चा मुद्देमाल यातील आरोपी क्र. ०१ यांनी चोरी करुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com