कामठी तालुक्यातील खाजगी रुग्णालयात मनमानी कारभार

 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– 30 रुपयाच्या सलाईनचे उकळतात 300 ते 400 रुपये

– बहुतांश खाजगी रुग्णालये अजूनही दरफलकाविना

कामठी :- कामठी तालुक्यात उष्मघाताने चांगलाच जोर पकडला असून सूर्य आग ओकत आहे त्यातच शहर तसेच ग्रामीण भागात व्हायरलची साथ सुरू आहे.उन्हामुळे तापाचे रुग्ण वाढल्यामुळे डॉक्टरांचा सलाईनचा धंदा जोरात सुरू आहे.अनेक रुग्णालयात 25 ते 30 रुपयात मिळणारे सलाईन चे दर 300 रुपया पर्यंत लावले जात असल्याने खाजगी रुग्णालयात मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे तसेच बहुतांश रुग्णालयात दरपत्रक दिसेनासे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे व्हायरल ची साथ सुरू असून विविध आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात ओपीडी वाढली आहे.वाढत्या रुग्णसंख्येचा काही ठिकाणी गैरफायदा घेतला जात आहे.काही खासगी डॉक्टरकडून 30 रुपयांचे सलाईन 300 ते 400 रुपयांना दिले जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे त्याचबरोबर सलाईन लावण्यासाठी बेड चार्जच्या नावावर गोरगरीब रुग्णाकडून एक दिवसाचे पाचशे रुपये उकळले जात आहेत .

आरोग्याचा प्रश्न असल्याने अनेक जण डॉक्टरांशी किंवा तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत नाहीत याचाच गैरफायदा खासगी रुग्णालयाकडून घेतला जात आहे.त्यामुळे खासगी रुग्णालयावर प्रशासनाचे नियंत्रण नाही का?असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.उपचाराच्या नावाखाली अनावश्यक असलेल्या चाचण्या,औषधे,उपकरणे,वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटीच्या नावाखाली रुग्नाकडून हजारो रुपये उकळण्याचे प्रकार सुरू आहेत.या लुटीमुळे रुग्ण कमालीचे त्रस्त झाले आहेत.रुग्णांची लूट सुरूच असून अनेक रुग्णालय अधिकच्या चाचण्या आणि औषधांचा जादा वापर दाखवून बिले फुगवितात त्यामुळे रुग्णालयात दरपत्रक असणे अति आवश्यक आहे.

-खासगी रुग्णालयांना दरपत्रकाचा विसर

-महाराष्ट्र शासनाने नर्सिंग कायद्यात काही महत्वपूर्ण बदल केले आहेत त्यानुसार सर्व रुग्णालयांनी दर्शनी भागात सुविधांचे दरपत्रक लावने बंधनकारक केले आहे परंतु खासगी रुग्णालयाना दरपत्रकाचा विसर पडला आहे त्यामुळे अशा रुग्णालयावर कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी थरमॅक्सच्या अनु आगा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

Sat Jun 1 , 2024
– बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे प्लॅटिनम ज्युबिली पुरस्कार युवा उद्योजकांना प्रदान – व्यवस्थापन शिक्षण परवडणारे व गुणवत्तापूर्ण करण्याची राज्यपालांची सूचना मुंबई :- आपल्या स्थापनेचे ७० वे वर्ष साजरे करीत असलेल्या बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे (बीएमए) देण्यात येणारा ‘के एस बसू जीवन गौरव पुरस्कार’ थरमॅक्स लिमिटेडच्या माजी अध्यक्षा व ‘टीच फॉर इंडिया’ कार्यक्रमाच्या संस्थापिका अनु आगा यांना समारंभपुर्वक प्रदान करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com