शेतकऱ्याच्या मुलीने घातली आभाळाला गवसणी

– ९७% गुण मिळवीत अपेक्षा सोमनकर हिंगणा तालुक्यात प्रथम

नागपूर :- नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालात बापू शिक्षण संस्था अंतर्गत श्रीकृष्ण हायस्कूल सावंगी (आसोला) या शाळेचा निकाल १००% लागला असून घोडेघाट येथील शेतकऱ्याची मुलगी अपेक्षा श्रावण सोमनकर हिने ९६.६०% गुण मिळवून हिंगणा तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

विशेष बाब म्हणजे नागपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दुर्गम अशा घोडेघाट या खेड्यातील अपेक्षा चे आई वडील शेतकरी असून ती सुद्धा सुटीच्या दिवशी शेताच्या कामाला जायची.घरची परिस्थिती फारच तुटपुंजी असून शिकवणी लावला सुद्धा पैसा पुरेसा पडत नसल्याने आपल्या अथक परिश्रमातून विना शिकवणी अपेक्षा नें हे यश तिने संपादन केले. तिने या यशाचे श्रेय आई वडील, आपले गुरुजन व संचालक मंडळ यांना दिले.तिच्या या दैदीप्यामान यशाचे कौतुक करण्यासाठी

संस्थेच्या व शाळेच्या वतीने घरी जाऊन तिला गौरवांवित करण्यात आले.या प्रसंगी बापू शिक्षण संस्थेचे संचालक बाबुभाई पाटीदार, गजानन बावणे, विलास कडू, माजी मुख्याध्यापक पुरणदास खोबे,प्र.मुख्याध्यापक प्रकाश पिंपळे, वर्ग शिक्षिका माया बावणे, विनोद परांडे, राजेंद्र वांदिले,स्मिता डहाके, प्रभाकर अडसुळे व नाना पेंदाम उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

MILITARY HOSPITAL, KAMPTEE CONDUCTED A MEDICAL CAMP AT SHRADHANAND ANATHALAYA,NAGPUR 

Sat Jun 1 , 2024
Nagpur :- Military Hospital, Kamptee under the aegis of HQ Uttar Maharashtra & Gujarat Sub Area conducted a medical camp as “WE CARE CAMPAIGN” for children at Shradhanand Anathalaya at Nagpur. Facilities for Health screening and free medicines were made available. A Dental team from Military Dental Centre, Kamptee also carried out a dental checkup and rendered advice on dental […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com