संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 1:-महाराष्ट्र शासनाने राज्यभर प्रिपेड इलेक्ट्रॉनिक वीज मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रात सुदधा ही मोहीम राबविण्यात येणार आहे मात्र ही मोहीम सर्वसामान्य जनतेच्या हिताची नसून गरीब जनतेला त्रास देऊन धनदांडग्यांना फायदा पोहोचविणारी आहे त्यामुळे ही प्रीपेड इलेक्ट्रॉनिक मोहीम रद्द करण्यात यावी अशी मागणी कामठी शहर कांग्रेस सेवादल च्या वतीने कामठी-मौदा विधानसभा चे नेते माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात उपकार्यकारी अभियंता राठोड यांना दिलेल्या सामूहिक निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की कामठी मौदा विधानसभा क्षेत्रात बहुतांश आर्थिकदृष्ट्या कमजोर ,मजूर,शेतकरी वर्ग वास्तव्यास असून तुटपुंज्या आर्थिक स्रोतातून विजेचे बिल भरतात बरेचशे मजुरांची कमाई ही पोटाची खळगी भरण्यासह विजेचे बिल भरण्यातच जाते.आधीच तीन पट वीज दर आकारला जातो विज बिल वेळेवर भरूनही ग्राहकांना नियमित विज मिळत नाही .विजेच्या समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिक,शेतकरी त्रस्त झाला आहे.आता घरगुती वीज वापरासाठी प्रीपेड इलेक्ट्रॉनिक वीज मीटरची सक्ती करणार आहेत.मीटरचे रिचार्ज संपले की अचानक विज खंडित होणार त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरदार,कामगारांना अंधारात राहण्याची वेळ येणार आहे तेव्हा शासनाने ही मोहीम रद्द करावी अशी मागणी माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर सह कामठी कांग्रेस सेवादलच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे.
याप्रसंगी माजी नगरसेवक निरज लोनारे ,माजी नगरसेवक मोहम्मद अरशद , महाराट्र कांग्रेस सेवादल सहसचिव राजकुमार गेडाम, कामठी शहर कांग्रेस सेवादल अध्यक्ष मोहम्मद सुलतान, नागपुर जिला कांग्रेस सेवादल सचिव अब्दुल सलाम अंसारी ,नागपुर जिला कांग्रेस सेवादल सचिव सोहेल अंजुम , मीर आरिफ अली ,तौशीफ फैजी ,,कामठी शहर कांग्रेस सेवादल सचिव रफीक खान ,आकाश भोकरे ,प्रकाश लाईन पांडे ,मंजू मेश्राम,मोहम्मद इम्तियाज,मकबूल अहमद,मोहम्मद वसीम,मोहम्मद असलम, बी.डी. मेश्राम, विलास,सौरभ,हैदर अली, नमोद, सचिन,धीरज कुमार, विलास, विष्णु प्रभाकर,पंकज कुमार पदाधिकारी व कार्यकर्तागण मोठ्या संख्येत उपस्थित होते.