मुंबई :- राज्याच्या वस्तू व सेवाकर विभागाने विशेष तपास मोहिमेंतर्गत पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या तपास मोहिमेत एका व्यक्तीला 630 कोटी रुपयांच्या बनावट पावत्याद्वारे 110 कोटी रुपयांची बनावट कर क्रेडिट वापरुन पास केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती, राज्यकर सहआयुक्त, पुणे यांनी प्रसिद्ध‍ीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर विभागाने कर चुकविणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात राबविण्यात आलेल्या विशेष तपास मोहिमेंतर्गत पुण्यातील मेसर्स […]

मुंबई :- उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम मंदिराजवळ महाराष्ट्र भक्त निवास उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे अतिभव्य पुनर्निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील अयोध्यानगरीत श्रीराम जन्मस्थळी दर्शनासाठी भाविक फार मोठ्या संख्येने जात असतात. त्यांच्या निवासासाठी या […]

मुंबई :- राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना प्रचलित दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत दुपट्टीने मदत देण्याचा राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला होता, त्यानुसार औरंगाबाद आणि पुणे विभागासाठी १२८६ कोटी ७४ लाख ६६ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे लाखो बाधित शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. […]

कस्तुरबा रुग्णालयात जाऊन केली रुग्ण- नातेवाईकांची विचारपूस, आरोग्य यंत्रणेकडून घेतला आढावा मुंबई :- मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका आणि आरोग्य विभाग यांनी व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महापालिकेने सुमारे १२ हजार बालकांचे लसीकरण केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. मुंबई शहरातील गोवर प्रादुर्भावामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मुख्यमंत्री […]

धारावी पुनर्विकासालाही गती देणार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे लोकार्पण मुंबई :- मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी व्हावे असे धोरण आहे. यात धारावीचा पुनर्विकास हा महत्त्वाचा असून, येत्या काही काळात जगाचे लक्ष वेधून घेईल अशी वसाहत प्रत्यक्षात येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच मुंबईतील प्रत्येक गरजूला वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत, असे होऊ नये यासाठी […]

मुंबई :- थोर स्वातंत्र्यता सेनानी लाला लाजपतराय यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि. 17 नोव्हेंबर, 2022 रोजी हिंदू महासभेच्या टिळक रोड येथील कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्‍वस्त व माजी अध्यक्ष अरूण जोशी यांनी लाला लाजपतराय यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. भारतीय स्वातंत्र्याच्या काळात इंग्रजी सत्तेच्या क्रूर लाठीने वीरगती मिळालेले हिंदू […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यातील तालुका तिरोडा येथील पंचशील बहुउद्देशीय सेवा सह. संस्थाच्या वतीने १७ नोव्हेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी तिरोडा नगरपरिषदेच्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्यासाठी नायब तहसीलदार संजय नागपुरे, पोलीस निरीक्षक तिरोडा,व नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे साजनकुमार रामटेके अध्यक्ष, प्रविण चौव्हाण सचिव, सीमा साखरे सहसचिव, सह भाविका कोटांगले , रेखा सतदेवे, निर्मला […]

सिलीगुड़ी :-केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी की तबीयत एक कार्यक्रम के दौरान अचानक बिगड़ गई. गडकरी पश्चिम बंगाल में सिलीगुड़ी के दागापुर में कार्यक्रम में शामिल होने पहुंचे थे. इसके बाद पास के अस्पताल से टीम कार्यक्रम स्थल पर पहुंची और उन्हें प्राथमिक उपचार दिया गया. बताया जा रहा है कि शुगर लेवल कम होने के वजह से नितिन गडकरी […]

मनपा हिरवळीवर दिले धरणे : राजकीय दबाव असल्याचा आरोप नागपूर : नागपूर महानगरपालिकेमध्ये मागील १५ ते २० वर्षांपासून सेवारत असलेल्या कंत्राटी संगणक चालकांच्या जीवावर उठणारी अन्यायकारक निविदेचा राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनद्वारे निषेध नोंदविण्यात आला. अन्यायकारक निविदेच्या निषेधार्थ गुरूवारी (ता.१७) कंत्राटी संगणक चालकांनी मनपा मुख्यालयात हिरवळीवर धरणे दिले. मागील सुमारे 20 ते 25 वर्षांपासून १८९ कंत्राटी संगणक चालक नागपूर महानगरपालिकेला […]

नागपूर :- भारत सरकारची विज्ञान प्रसार संस्था, नागपूर महानगरपालिका आणि असोसिएशन फॉर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्यूकेशन (एआरटीबीएसई) यांच्या संयुक्त विद्यमाने अपूर्व विज्ञान मेळाव्याचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. अपूर्व विज्ञान मेळावा-२०२२च्या दुस-या दिवशी विद्यार्थी, शिक्षक आणि विज्ञानप्रेमींनी गर्दी करीत सहज सोप्या प्रयोगातून विज्ञानाची किमया दर्शविणा-या प्रयोगांचा आनंद लुटला. विशेष म्हणजे, हसत खेळत विद्यान शिकविणारा अपूर्व विज्ञान […]

मुंबई :- राज्यात दि. १७ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा कालावधीत विविध १४ सेवा आणि पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणांचा ९५ टक्के निपटारा करण्यात आला आहे. या मोहिमेत एकूण ८३ लाख ५७ हजार २१८ प्रलंबित अर्जांपैकी ७९ लाख ४५ हजार २२ अर्ज निकाली काढण्यात आले. याबद्दल आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ […]

  नागपूर :- राज्यात काही भागात गोवरची साथ पसरत असल्याने, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील नागरिकांना कुटुंबातील लहान मुलांना गोवर प्रतिबंधीत लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोवर हा प्रामुख्याने लहान मुलामध्ये आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. ताप, सर्दी, डोळे लाल होणे, खोकला अशी सुरूवातीची लक्षणे असतात. त्यानंतर पुरळ उठायला सुरवात होते, ती कपाळा पासून व नंतर मान व हातपाय पर्यंत पसरते. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -2आरोपीस अटक, नगदी 58 हजार रुपये हस्तगत कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राज रॉयल लॉन मध्ये आयोजित विवाह समारंभात नवरीच्या खुर्चीच्या बाजूला ठेवलेली नवरीच्या भेटवस्तूने अंदाजे 1 लक्ष रुपयाने भरलेली बॅग कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 7 नोव्हेंबरला सायंकाळी सहा दरम्यान घडली असता यासंदर्भात फिर्यादी राकेश लखोटे वय 34 वर्षे रा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बोरियापुरा ,मोंढा येथे गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात जुनी कामठी पोलिसांना गतरात्री 3 दरम्यान यशप्राप्त झाले असून या धाडीतून नगदी 15 हजार 950 रुपये, 61 हजार 500 रुपये किमतीचे महागडे मोबाईल व 52 तास पत्ती व इतर साहित्य असा एकूण 77 हजार 450 रुपयांचा […]

सुधारित पदार्थसूचीमुळे प्रादेशिक स्तरावरील मागण्या पूर्ण होतील. प्रीपेड प्रकारच्या गाड्यांच्या तिकिटांमध्ये प्रवास शुल्कासोबत खानपान सेवेचे शुल्क देखील समाविष्ट असते, अशा वेळी आधी सूचित केलेल्या शुल्कामध्ये दिले जाणारे अन्नपदार्थ आयआरसीटीसी निश्चित करेल. इतर मेल किंवा एक्प्रेस गाड्यांमध्ये आधी सूचित केलेल्या ठराविक शुल्कामध्ये दिल्या जाणाऱ्या प्रमाणित जेवण थाळीसारख्या मर्यादित खर्चाच्या पदार्थसूचीची निवड आयआरसीटीसीद्वारे केली जाईल जनता गाड्यांमधील जेवणाची पदार्थसूची आणि शुल्क यांच्यात […]

चंद्रपूर १७ नोव्हेंबर :- चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या नागरीकांना १३ हजारांचा दंड तर विनापरवानगी बोरींग खोदण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरीकांना ४००० रुपयांचा दंड करण्यात आला. घर,इमारत किंवा इतर काही बांधकामास वाळु, विटा, खडी,लोखंड,गिट्टी, मुरूम याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. काही मालमत्ताधारक बांधकामादरम्यान सदर साहीत्य बाहेर ठेवतात. नियमानुसार बांधकाम साहीत्य उघड्यावर ठेवता […]

पटांगणावर सुरु झाले योगनृत्य, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तुंची प्रदर्शनी चंद्रपूर १७ नोव्हेंबर :- नगिनाबाग योग नृत्य परिवाराने बनकर ले – आउट येथील मोकळे पटांगण अनेक दिवस परिश्रम घेऊन स्वच्छ केले. विशेष म्हणजे या योग नृत्य शाखेत एकही पुरुष सदस्य नसुन ६० महिला सभासद आहे. या सर्व महिलांनी स्वच्छतेचे साहीत्य घेऊन झाडे, झुडूप,दगडांनी भरलेल्या पटांगणाला पुर्ण स्वच्छ केले व आज या […]

मुंबई दि. १७ : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयात महिलांना विनामूल्य कायदेविषयक सल्ला देणारे केंद्र (लीगल एड क्लिनिक) सुरु करण्यात येणार असून यामुळे पीडित महिलांना न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयोगाकडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तत्पर मदत मिळेल, असे आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले. दि. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार्या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, […]

भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मृगांक वर्मा या युवकाची गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) निवड झाली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनएफडीसी) यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात होत असलेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवारी (16) रोजी शोध पथकाने 109 प्रकरणांची नोंद करून 81500 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com