राज रॉयल लॉन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-2आरोपीस अटक, नगदी 58 हजार रुपये हस्तगत

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राज रॉयल लॉन मध्ये आयोजित विवाह समारंभात नवरीच्या खुर्चीच्या बाजूला ठेवलेली नवरीच्या भेटवस्तूने अंदाजे 1 लक्ष रुपयाने भरलेली बॅग कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 7 नोव्हेंबरला सायंकाळी सहा दरम्यान घडली असता यासंदर्भात फिर्यादी राकेश लखोटे वय 34 वर्षे रा सेमीनेरी हिल्स नागपूर ने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी तपासाला दिलेल्या गतीतून या चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करून आरोपी चोरट्याचा शोध लावण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून दोन आरोपीना अटक करीत त्यांच्याकडून नगदी 58 हजार रुपये जप्त करण्यात आले.

अटक आरोपीचे नाव अमन सिसोदिया वय 20 वर्षे रा कडीया मध्यप्रदेश,अमित सासी वय 19 वर्षे रा खातोली राजस्थान असे आहे. ही यशस्वी कारवाही पोलीस उपायुक्त श्रवण दत्त ,एसीपी नल्लावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, गुन्हे पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांच्या मार्गदर्शनार्थ एपीआय जीवन भातकुले, पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, पोलीस उपनिरीक्षक नितीन पवार, पोलीस हवालदार संतोषसिंग ठाकूर, अनुप अढाऊ, निलेश यादव, अतुल राठोड, रोशन डाखोरे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यात काही भागात पसरली ( मीझल्स ) गोवराची साथ, मनपा आरोग्यविभागा तर्फे लसीकरणाचे आवाहन 

Thu Nov 17 , 2022
  नागपूर :- राज्यात काही भागात गोवरची साथ पसरत असल्याने, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील नागरिकांना कुटुंबातील लहान मुलांना गोवर प्रतिबंधीत लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोवर हा प्रामुख्याने लहान मुलामध्ये आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. ताप, सर्दी, डोळे लाल होणे, खोकला अशी सुरूवातीची लक्षणे असतात. त्यानंतर पुरळ उठायला सुरवात होते, ती कपाळा पासून व नंतर मान व हातपाय पर्यंत पसरते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com