अमरदिप बडगे, प्रतिनिधी वाघाची दहशत वाढली; भर दिवसा वाघाचे दर्शन मुंडीपार रस्त्यालगत जंगलात गोंदिया –  जिल्ह्यच्या गोरेगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत मुंडीपार रस्त्यालगतच्या जंगलात भर दिवसा वाघांचे दर्शन होत असल्याने या भागातील नागरिक धास्तावले आहेत. वाघाची दहशत वाढली असल्याने नागरीकानीं घराच्या बाहेर निघावे कसे, असा प्रश्न मुंडीपार गावातील नागरीकांपुढे निर्माण झाला आहे. नागझीरा अभयारन्य गोरेगाव तालुक्याला लागुन असल्याने सतत वाघांचे , बिबटचे दर्शन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- एकीकडे सर्वत्र बालके पळवून नेत असल्याच्या अफवा पसरत आहेत त्यातच आज स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा नेरी मार्गावरील कन्हान नदीच्या पात्रात एक दहा वर्षीय बालक मृतावस्थेत वाहून आल्याची घटना आज सायंकाळी 5 दरम्यान निदर्शनास आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यासह अन्य पोलिसांनी घटनास्थळ […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  जिल्ह्यातील दहा खेळाडुं पैकी ५ खेळाडुंना सुवर्णपदक व २ खेळाडुंना रजत पदक.  कन्हान : – नुकत्याच राज्यस्तरीय साम्बो स्पर्धा पुणे येथील लोणी काळभोर येथे पार पडल्या . यात नागपुर जिल्ह्यातील १० खेळाडुंची निवड झाली होती . त्या पैकी ५ खेळाडुंना सुवर्णपदक व २ खेळाडुंना रजत पदक पटकविले. यामध्ये बीकेसीपी स्कुल कन्हान च्या क्रिडा शिक्षक अमित ठाकुर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड गावातील एका शेतशिवारात झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान निदर्शनास आली असून अनोळखी मृतकाची ओळख अजूनही पटलेली नाही तर ही घटना अंदाजे जवळपास 10 दिवसापूर्वीची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून मृतदेह पूर्णता कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतकाची दुर्गंधी पसरल्याने सदर घटना […]

नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर शहर तर्फे आज २७ सप्टेंबरला अन्न व पुरवठा मुख्य कार्यालय सिव्हिल लाईन येथे नागपुरात मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची कालाबाजारी होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे धरणा प्रदर्शन व नारे निदर्शने करून शहर अध्यक्ष दुनेश्र्वर पेठे यांनी त्यांच्या अधिकारी भेंडे  यांना निवेदन देण्यात आले. गरीब राशनकार्ड धारक स्वस्त सरकारी अन्न धान्यावर निर्भर आहे. त्यांच्या हक्काचा धान्याची शहरातील महल, […]

नागपूर :-  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे उद्यापासून (दि.२८) दोन दिवसांच्या नागपूर दौ-यावर येत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे उद्या बुधवारी (दि.२८) दुपारी पावणेपाच वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते राजभवनकडे प्रयाण करतील.भगतसिंह कोश्यारी रात्री राजभवन येथे मुक्काम करतील. शहरात गुरुवारी (दि. २९) सकाळी दहाला आयोजित एका स्थानिक कार्यक्रमास त्यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यानंतर सकाळी सव्वाअकरा वाजता त्यांचे राजभवन […]

नागपूर :- नागपूर कोषागार अंतर्गत असलेल्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना कळविण्यात येते की, ज्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे वय 80 वर्षे किंवा 80 वर्षावरील झाले आहे. मात्र, त्यांच्या निवृत्तीवेतनात 10 टक्के वाढ करण्यात आली नाही. अशा कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी जन्म तारखेचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किवा पॅनकार्ड, आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत ) कोषागार कार्यालय, नागपूर येथे सादर करावा. जेणेकरुन त्यांना 80 वर्षानंतरचा […]

नागपूर :- माहिती अधिकार दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (नागपूर-अमरावती विभाग) आणि पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (दि.28) एक दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविभवन, सिव्हिल लाइन्स नागपूर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये सायंकाळी साडेसहाला करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे तर विशेष अतिथी म्हणून डॉ. नवीन अग्रवाल प्रमाणित माहिती […]

नागपूर :-  देशात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू करण्यात आला आहे. शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच् राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमुख झाला आहे. त्यामुळे हा दिवस राज्य पातळीवर दरवर्षी ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  -3 लक्ष रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस कामठी ता प्र 27:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपती रामेश्वर बावनकर यांच्या बंगल्याच्या बाजूला असलेल्या निर्मल उज्वल क्रेडिट को ऑप सोसायटी ली. नागपूर(मल्टिस्टट) बँकेचे माजी मॅनेजर व बँक कर्मचारी ने एका महिला खातेदाराची दिशाभूल करून विश्वासघात करीत 3 लक्ष रुपयाची आर्थिक फसवणुक केली तर हा प्रकार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नवरात्री उत्सवानिमित्त कामठी तालुक्यातील 18 वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या आरोग्य तपासणीसाठी 27 सप्टेंबर पासून ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राबविण्यात येत आहे ज्याचा शुभारंभ आज 27 सप्टेंबर ला करण्यात आला आहे तेव्हा या […]

महात्मा फुले यांचे सत्यशोधक समाजाचे विचार देशातील शेवटच्या तरुणाच्या मनात रुजविण्यासाठी प्रयत्न करावे… सत्यशोधक समाजाचे विचारच देशाला जातीपातीच्या व धर्मभेदाच्या यादवीतून वाचवू शकतात – छगन भुजबळ देशात फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे शरद पवार हे एकमेव नेते – छगन भुजबळ सत्यशोधक चळवळ पुढे नेताना पुण्यातील भिडे वाड्यासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल… सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त खासदार शरद पवार यांच्या हस्ते […]

मुंबई :- गुजरात विकास मॉडेल अभ्यासासाठी राज्याचे वनमंत्री आणि उद्योगमंत्री गुजरातला जातात एवढी मोठी नामुष्की ईडी सरकारमुळे महाराष्ट्रावर आलीय अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. ईडी सरकारचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना महाराष्ट्रात गुंतवणूक कशी आणायची याचा अभ्यास करण्यासाठी गुजरातला जावं लागतं याच्यासारखे दुर्दैवी सरकार महाराष्ट्रात असूच शकत नाही असा […]

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही 3 ते 5 ऑक्टोबरदरम्यान धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात जवळपास 50 हजार अनुयायांना धम्मदीक्षा दिली जाणार आहे, अशी माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी माध्यमांशी बोलताना दिली. धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या मुख्य सोहळ्याला देश-विदेशातील अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. यादिनाचे औचित्य साधून भदंत […]

बोरिवली केंद्रामुळे पालघर, डहाणू पर्यंत कर्करुग्णांना दिलासा मिळणार कर्करुग्णांना निवारा देणाऱ्या नाना पालकर रुग्ण सेवा सदनसारख्या अनेक संस्था निर्माण व्हाव्या : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबई :- नाना पालकर स्मृती समिती आपल्या रुग्ण सेवा सदनाच्या माध्यमातून देशभरातील गोरगरीब कर्करुग्ण व त्यांच्या नातलगांना मोफत व नाममात्र शुल्क घेऊन निवारा, अन्न व औषधोपचार देण्याचे सेवाभावी कार्य निःस्वार्थ भावनेने करीत आहेत. मुंबई येथे उपचारासाठी […]

मुंबई :- पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आज दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

नागपूर :- जिल्हा मध्यवर्ती बँक व सहकारी पतसंस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सहकारी बँक व पतसंस्थांव्दारे नियमित कर्ज वितरणासह त्यानुषंगाने कर्जवसुली झाली पाहिजे. बँकांचे एनपीए खात्यांचे प्रमाण वाढू नये, यासाठी पतसंस्था व सहकार विभागाने थकीत कर्ज वसुलीची टक्केवारी वाढवावी, असे आदेश सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज येथे दिले. रवीभवन येथे सहकार विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत […]

नागपूर :-   मंत्री डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सुचनेनुसार, राज्यात दिनांक 26/09/2022 पासुन 05/10/2022 पर्यंत नवरात्री उत्सवात 18 वर्षावरील महिलांच्या आरोग्य तपासणीबाबतचा “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे अभियान राज्यभर राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सदर उपक्रम राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानअंतर्गत म.न.पा. नागपूर मध्ये कार्यरत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच म.न.पा दवाखाने […]

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.26) 06 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 76 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात नेहरुनगर, गांधीबाग, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 8 किलो प्लास्टिक जप्त करण्यात […]

नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी  सेवा पंधरवाड़ा अंतर्गत मनपाची विशेष शिबिरे चंद्रपूर :-  महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत नवरात्र उत्सवानिमित्त ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” अभियान दि. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत राबविले जात असुन याअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर प्रत्येक झोनमध्ये २७,२८ आणि २९ सप्टेंबर रोजी आयोजीत केले गेले आहे. यात तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com