६० महिलांनी केली पटांगणाची स्वच्छता

पटांगणावर सुरु झाले योगनृत्य,

टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तुंची प्रदर्शनी

चंद्रपूर १७ नोव्हेंबर :- नगिनाबाग योग नृत्य परिवाराने बनकर ले – आउट येथील मोकळे पटांगण अनेक दिवस परिश्रम घेऊन स्वच्छ केले. विशेष म्हणजे या योग नृत्य शाखेत एकही पुरुष सदस्य नसुन ६० महिला सभासद आहे. या सर्व महिलांनी स्वच्छतेचे साहीत्य घेऊन झाडे, झुडूप,दगडांनी भरलेल्या पटांगणाला पुर्ण स्वच्छ केले व आज या पटांगणावर योगनृत्य सुरु झाले आहे.

स्वच्छ केलेल्या याच मैदानावर १३ नोव्हेंबर रोजी नगिनाबाग योग नृत्य परिवार शाखेचे उद्घाटन योगनृत्याचे जनक गोपाळ मुंदडा यांच्या हस्ते झाले. उद्घाटनास मनपाचे वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉ. अमोल शेळके, सिटी संयोजक गिरिराज प्रसाद,धनंजय तावडे, योगनृत्य प्रशिक्षक आकाश घोडमारे, मुग्धा खांडे,बंडू टेकाम व इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तुंची प्रदर्शनी आयोजीत करण्यात आली. त्यात महिलांनी खराब प्लास्टीकपासुन उपयोगाच्या शोभिवंत वस्तू, तसेच प्लास्टीक रॅपरपासुन बनविलेल्या विविध वस्तू तसेच ओल्या कचऱ्यपासून पासुन बनवले कंपोस्ट खत दाखविण्यात आले. तसेच स्वच्छता या विषयावर प्रतिभा काडे लिखित पथनाट्याचे सादरीकरण सुद्धा करण्यात आले.

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन चंद्रपूर शहर ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा ” आयोजित केली गेली असुन स्पर्धेत नगिनाबाग योग नृत्य परिवाराने भाग घेतला आहे.टीम चे कॅप्टन मंगेश खोब्रागडे, केंद्र प्रमुख शारदा मुरस्कर, रेखा पाटील, नलिनी नवघरे , ॲड. प्रतिभा येरेकर,धिरेंद्रकुमार मिश्रा, कवीता कोटवार, प्रमिला दुबे आणि इतर महिलावर्गाच्या सहकार्याने स्वच्छतेचे कार्य उत्साहात सुरु असुन प्लास्टिक बंदी, ओल्या कचऱ्यापासुन खत तयार करणे, कचऱ्याचे व्यवस्थापन या विषयावर जनजागृती सातत्याने करण्यात येत आहे. स्वच्छता लीग या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण आणि कंपाउंड वॉलची रंगरंगोटी सुद्धा करण्यात येत आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बांधकाम साहित्य रस्त्यावर, १३ हजारांचा दंड

Thu Nov 17 , 2022
चंद्रपूर १७ नोव्हेंबर :- चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या नागरीकांना १३ हजारांचा दंड तर विनापरवानगी बोरींग खोदण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरीकांना ४००० रुपयांचा दंड करण्यात आला. घर,इमारत किंवा इतर काही बांधकामास वाळु, विटा, खडी,लोखंड,गिट्टी, मुरूम याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. काही मालमत्ताधारक बांधकामादरम्यान सदर साहीत्य बाहेर ठेवतात. नियमानुसार बांधकाम साहीत्य उघड्यावर ठेवता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com