थोर स्वातंत्र्य सेनानी लाला लाजपतराय यांना अभिवादन

मुंबई :- थोर स्वातंत्र्यता सेनानी लाला लाजपतराय यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि. 17 नोव्हेंबर, 2022 रोजी हिंदू महासभेच्या टिळक रोड येथील कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्‍वस्त व माजी अध्यक्ष अरूण जोशी यांनी लाला लाजपतराय यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या काळात इंग्रजी सत्तेच्या क्रूर लाठीने वीरगती मिळालेले हिंदू महासभेचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष, थोर स्वातंत्र्य सेनानी, पंजाब केसरी लाला लाजपतराय यांनी 1925 मध्ये कलकत्ता येथे झालेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान भुषविले होते. त्यावेळी हिंदू धर्म आणि त्याचे रक्षण यावर दिलेल्या त्यांच्या भाषणाने देशात राष्ट्रभक्तीची जागृती निर्माण केल्या गेली. त्यामुळे ते हिंदूस्थानच्या जनतेचे प्रेरणास्थान बनलेे. लाला लाजपतराय यांनी राजकारणासोबत हिंदू संघटन, समाज सुधारणा इत्यादी क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावली. आजच्या युवा पिढीने त्यांचा आदर्श घेऊन राष्ट्रहिताचे कार्य करावे असे अरूण जोशी यांनी या प्रसंगी सांगितले. कार्यक्रमास अरविंद दिवे, अनंत पाध्ये, कैलास शेजोळे, अजय मुडे व हिंदू महासभेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. वंदेमातरमच्या जयघोषात कार्यक्रम संपन्न झाला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com