संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आजपासून सुरू झालेला दहा दिवसीय श्री गणेशोत्सव तसेच आगामी काही दिवसानंतर होणाऱ्या ईद ए मिलाद यासारखे सणोत्सव साजरे होणार आहेत.तरी नागरिकानी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आगामी सणोत्सव सलोख्याने व शांततेत साजरे करावेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे .महापूरुषांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या भूमीत गणेशोत्सवासह आगामी उत्सव सन मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो या उत्सवात सर्व समुदायाचे लोक सहभागी होत असतात .
सामाजिक उपक्रम राबवून या सणोत्सवात कायद्याचे काटेकोर पालन करून शांततेत साजरा करून धार्मिक एकात्मता निर्माण करावी असे आवाहन आवाहन डीसीपी निकेतन कदम यांनी केले.
कामठी तहसील कार्यालयात पोलीस पाटील,गणेश मंडळाचे पदाधिकारी,ईद ए मिलाद चे पदाधिकारी,सदस्य,पत्रकार यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. याप्रसंगी नायब तहसीलदार उपेश अंबादे, एसीपी विशाल क्षीरसागर, मुख्यधिकारी संदीप बोरकर, महावितरण उपअधीक्षक राठोड, पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे,पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे,पोलीस निरीक्षक पतंगे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सांगितले की उत्सव साजरे करताना कोणत्याही प्रकारचे डीजे लावता येणार नाहीत .फक्त दोन टॉप दोन बेस चे म्युजिक सिस्टिम लावण्याची परवानगी आहे.कामठी शहरात शांततेत सण उत्सव साजरे होण्याची पाश्वरभूमी आहे.ती कायम राखत सण, उत्सवात ते अतिशय आनंदाने साजरे करावेत.कामठी शहरात विविध जाती पंथातील नागरिक दोन बंधू प्रमाणे वर्तन करतात त्यामुळे यापुढेही सामंजस्याचे,धार्मिक सलोख्याचे वातावरण आगामी उत्सवात देखील राखला जाण्यासाठी प्रशासनाकडून समन्वय राखला जाईल.श्री गणेशोत्सव विसर्जन दिवशी व सर्व कालावधीत सर्वोच्च नायालयाने घालून दिलेली वाद्य तसेच आवाजाच्या वेळेची मर्यादा पाळावी .
सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणीही संदिग्ध पोस्ट शेअर,लाईक करू नये, कुणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन डीसीपी निकेतन कदम यांनी केले. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच ईद ए मिलाद च्या पदाधिकारी व सदस्यांनी विविध समस्यां सांगितल्या.या शांतता समितीच्या बैठकीस गणेश मंडळाचे पदाधिकारी ,पत्रकार व व्यापारी यांच्यासह नागरिक वर्ग उपस्थित होते.