सावनेर :- दिनांक ०७/०५/२०२३ रोजी पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर ठाणेदार पोलीस स्टेशन सावनेर यांनी पोस्टे सावनेर अप क्र. ३००/२०२३ कलम ३७९, ३४ भादवि व अप क्र. २४७ / २०२३ कलम ३७९, ३४ भादवि चे गुन्हयाचे तपास कामी नियुक्त केलेले डीबी पथक मधील पोलीस उपनिरीक्षक व्यंकटेश दोनोडे पोलीस हवालदार सुरेंद्र वासनिक, पोलीस नायक प्रकाश ठोके, निलेश तायडे, खी मेश्राम, पोलीस शिपाई सचिन लोणारे, यांनी सदर गुन्हयात आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे- राहुल उर्फ बाला दिलीप मडावी वय १९ वर्ष रा. चिचपुरा सावनेर यांचे ताब्यातून गुन्हयात चोरी गेलेली १) होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम. एच-४० / बी. व्ही. – ५९८० किमती अंदाजे ११,०००/- रू. २) विना नंबरची एक बजाज प्लॅटीना काळ्या रंगाची मोटरसायकल किमती अंदाजे १०,०००/- ३) एक काळया रंगाची होंडा लिव्हो कंपनीची मोटरसायकल ज्याचे मागील नंबर प्लेटवर क्र. एम.एच-४० ए. एन ०८३३ किमती अंदाजे २०,०००/- रू. ४) एक काळया रंगाची होडा शाईन मोटरसायकल क्र. आर. जे. २५ / एस.क्यु. १४५९ किमती अंदाजे २०,०००/-रु. ५) एक लाल रंगाची होंडा सी. डी. डिलक्स मोटरसायकल क्र. एम.एच-३१ / सी. डब्ल्यू- १४५२ किमती अंदाजे २५,०००/- रु. असा एकुण ८६,०००/-रूपयाचा मुद्देमाल पोस्टे सावनेर व पोस्टे खापा (अनु. क्र. ०३) या गुन्हयातील हस्तगत करण्यात आलेला आहे. व त्याचे इतर साथीदार फरार आहेत.
मोटर सायकल चोरी करणारा आरोपी गजाआड पोलीस स्टेशन सावनेर नागपुर ग्रामिण ची कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com