नागपूर :-पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांनी दिलेल्या आदेशावरून परि सहायक पोलीस अधीक्षक अनिल महस्के, परि, पोलीस उपअधीक्षक राहुल झालटे, पोलीस निरीक्षक सतीश सोनटक्के आणि नायब तहसीलदार संदीप डाबेराव यांचेसह महसूल विभागाचे अधिकारी यांनी अवैध रेतीचा साठा ठेवणाच्या इसमाविरूद्ध संयुक्त कारवाई करून पोस्टे खापा हद्दीतील रामडोंगरी परीसरात दिनांक ७ /०५/२०२३ रोजी सकाळी ६ वाजता रेड टाकून राम डोंगरी परिसरात सुमारे ३१२ ब्रास रेतीचा अवैध साठा जप्त केला. काही साठा हा झुडपी जंगल जमिनीवर आढळून आला तसेच काही साठा हा खाजगी जागेवर आढळून आलेला आहे. सदर साठा हा जप्त करण्यात आलेला आहे व पुढील कायेदशीर कारवाई करीता तहसिल कार्यालय खापा यांच्या ताब्यात देण्यात आले.