‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संचालक डॉ. कैलास मोते यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘फलोत्पादन विभागाच्या योजना व अंमलबजावणी’ या विषयावर फलोत्पादन विभागाचे संचालक, डॉ. कैलास मोते, यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संचालक डॉ. मोते यांची मुलाखत मंगळवार दि.१८ मार्च २०२५ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असून, महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरील पुढील लिंकवर देखील ही मुलाखत पाहता येणार आहे. ज्येष्ठ निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यात कृषि क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे विविध फळपिके, भाजीपाला यांच्या उत्पादनात व उत्पादकतेत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव तसेच ग्राहकांनाही वाजवी दरात शेतीमाल उपलब्ध करुन देण्यासाठी फलोत्पादन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. राज्याला फलोत्पादन क्षेत्रात आघाडीवर आणण्यासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना फलोत्पादन क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न याविषयी फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. मोते यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रेडीओ क्लब येथील नवीन जेट्टीचे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते भूमीपूजन

Fri Mar 14 , 2025
मुंबई :- रेडीओ क्लब येथील प्रवासी जेट्टी, टर्मिनल इमारतीचे भूमीपूजन बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते. ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील अस्तित्वातील जेट्टीवरील सुविधा प्रवाशांकरीता अपुरी पडत असल्याने वृद्ध व्यक्ती, स्त्रीया व लहान मुले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!