राजधानीत यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

नवी दिल्ली :- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज दोन्ही महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.

कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास करून अभिवादन केले, यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, सर्वश्री खासदार सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, शोभा बच्छाव, नरेश मस्के, बाळुमामा म्हात्रे, निलेश लंके, भाऊसाहेब वाकचौरे, श्यामकुमार बर्वे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यासह अतिरीक्त निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, पत्रकार, सदनातील अतिथी मान्यवरांनी आणि महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

महाराष्ट्र पर‍िचय केंद्रात उपसचांलक अमरज्योत कौर अरोरा यांनी यशवतंराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांनेही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

यवतमाळ, वाशिमसाठी नव्या रस्ते विकास प्रकल्पांना गती द्या - खासदार संजय देशमुख यांची लोकसभेत मागणी

Thu Mar 13 , 2025
नवी दिल्ली :- यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील रस्ते अपुऱ्या अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत शून्य प्रहरात खासदार संजय देशमुख यांनी लोकसभेत प्रश्नाव्दारे नवीन रस्ते बांधण्याबाबत विनंती केली . त्यांनी यवतमाळच्या संविधान चौकात नव्या ब्रिजच्या निर्मितीसह, वाशिम शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चार लेनमध्ये रूपांतर करण्याची ही मागणी केली. खासदार देशमुख यांनी लोकसभेत मांडले की, “यवतमाळमधील संविधान चौक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!