Ø नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद
Ø 66 नागरिकांच्या नामांतरण अर्जावर कार्यवाही
Ø नागरिकांनी ऑनलाईन तक्रारी सादर करव्यात
नागपूर :- नगर भूमापन अधिकारी क्रमांक 1 या कार्यालयाशी संबंधित असलेल्या मौजा नागपूर (खास) येथील प्रलंबित असलेल्या वारसा नोंद, मिळकत पत्रिका काढणे, मोजणी अर्ज आदी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आयोजित समाधान शिबीरामध्ये 125 नागरिक उपस्थित राहून अर्ज व तक्रारी दाखल केल्या. या समाधान शिबीराच्या माध्यमातून 66 नागरिकांनी मिळकती बाबतचे नामांकरण अर्ज दाखल केले, या अर्जावर कार्यवाही करून नमुना 9 ची नोटीस देण्यात आली असल्याची माहिती नगर भूमापन अधिकारी प्रशांत हांडे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानूसार 100 दिवसांच्या विशेष कृती आराखड्यानूसार समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. नगर भूमापन कार्यालयाशी संबंधित असलेल्या जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात भूमिअभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे यांनी भेट देवून नागरिकांसोबत संवाद साधला यावेळी जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख अभय जोशी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुनिल मित्रा उपस्थित होते.
नगर भूमापन कार्यालयामध्ये भु-क्रमांक केंद्र तयार करण्यात आले असून नागरिकांना ऑनलाईन सेवा पुरविण्यात येतात. या सेवांसाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता नसून कार्यालयाने स्वतंत्र सिटी सर्व्हे ग्रेव्हेन्सेस नावावे ऑनलाईन सेवा नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी अर्ज अथवा तक्रार ऑनलाईन पद्धतीने सादर करावे, असे आवाहन भूमि अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे यांनी केले आहेत.
ऑनलाईन सुविधामध्ये मिळकत पत्रिका काढणे, मोजणी अर्ज भरणे, वारस नोंदिची अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्याची सुविधा आहे. या सुविधांमूळे तक्रारींची तसेच अर्जाची जलद गतिने निपटारा करणे सुलभ झाले आहे. नगर भूमापन अधिकारी क्रमांक 1 येथील समाधान शिबीरात नागरिकांनी सादर केलेल्या अर्ज व तक्रारी जलद गतिने सोडविण्यात आल्या असल्यामूळे नागरिकांनाही या शिबीराचा लाभ झाल्याचा अभिप्राय नोंदविला. रमेश गंगारामजी धारोडकर, विजय बालाजी मरजिवे तसेच राहूल गेडाम यांनी फेरफार शिबीरामध्ये समाधान झाले असून प्रलंबित असलेले प्रकरण निकाली निघाल्याचे समाधान व्यक्त केले.