लेझर ड्रोन लाईट शो द्वारे शिवजयंती साजरी

नागपूर :- भारतीय जनता युवा मोर्चा, दक्षिण नागपूर द्वारे आमदार मोहन मतेंच्या मार्गदर्शनात सक्करदरा तलाव परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ड्रोन लाईट शो, लेझर मॅपिंग शो तसेच फटका शो चे भव्य आयोजन करण्यात आले. शिवाजी महाराजांवरील लघुकथापट तसेच भारतीय संस्कृतीची संक्षिप्त गाथा अत्यंत सुंदररित्या मोकळ्या आसमनतात अंकीत करण्यात आली, या उत्साहपूर्ण कार्यक्रमात सुमारे ४०००० हून अधिक युवक-युवती तसेच नागरिकांनी सहभाग घेतला. आय.आय.टी. च्या विद्यार्थ्यांद्वारे मेक इन इंडिया च्या आधारे तयार केलेल्या या तंत्रात्मक कलाकृ‌तीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

उपरोक्त शिवजयंती सोहळा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नागपूर संस्थांचे राजे मुधोजीराव भोसले यांच्या अध्यक्षतेत पार पडला. सदर कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून भारतीय जनात पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, विधानपरिषदेचे माजी सदस्य गिरीश व्यास, भाजपा शहर उपाध्यक्ष संजय ठाकरे, नागपूर संस्थांचे राजे संग्राम सिंह भोसले, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त कोते साहेव, नागपूर विद्यापीठाचे विष्णुजी चांगदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दक्षिण नागपूरच्या भाजयुमो कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आमदार टेकचंद सावरकर यांच्या द्वारे आयोजित नमो चषक क्रिकेट स्पर्धेचा समारोप थाटात ! 

Thu Feb 22 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी मौदा विधानसभा क्षेत्रात आयोजित नमो चषक क्रिकेट स्पर्धेचा दिनांक २१ – २ – २०२४ रोजी अंतिम सामना खेळण्यात आला. अगदी चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात जगदंबा वॉरियर्स कोराडी संघ विजेतेपद तर आली गृप कामठी संघ उप विजेतेपद मिळवण्यास यशस्वी ठरला . स्पर्धेत एकूण ७८ संघांनी सहभाग घेतला व क्रिकेट प्रेमींचा सुद्धा या चषकाला उत्तम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com