रणाळ्यात तरुणाची गळफास लावून आत्महत्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील आपल्या राहत्या घरातील खोलीत सिलिंग फॅन ला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दीड दरम्यान उघडकीस आली असून मृतक तरुणाचे नाव सौरभ रामटेके वय 30 वर्षे रा रणाळा कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक व त्याची बहिण घरी असता सदर मृतक बराच वेळ होऊन खोलीबाहेर पडला नसल्याने बहिणीने फोन लावून बोलण्याचा प्रयत्न केला असता कुठंलेही प्रतिउत्तर न मिळाल्याने खोलीत डोकावून बघितले असता सदर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आल्याने एकच धक्का बसला. घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.मात्र आत्महत्येचे कारण लवकरच स्पष्ट होईल असा आशावाद पोलिसांनी व्यक्त केला .मृतकाच्या पाठीमागे आई,वडील,व एक बहीण असा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार वितरित

Fri Jun 9 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कढोली ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ग्राम पंचायत कढोली येथे 31 मे ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती निमित्य व महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ग्रा.पं.कार्यालय कढोली इथे जयंती साजरी करून महिला व बाल विकास श्रेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिला स्मिता ठाकरे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!