नागपूर :- फिर्यादीचे वडील चांगोजी कवल मते, वय ८४ वर्षे, रा. न्यू येरखेडा, कामठी, नागपूर हे ईलेक्ट्रीक बिल भरण्याकरीता पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीत येरखेडा, रंगेवार हॉलचे समोरून पायदळ जात असता, दुचाकी क. एम.एच ४९ वी. व्ही ७४०२ वा चालक नामे निखील शिवदास बांदपूरकर वय २५ वर्ष रा. ४ नंबर नाकाजवळ, नागराज नगर, जुनी कामठी रोड, नागपूर याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, निष्काळजीपणे व धोकादायकरित्या चालवून फिर्यादीचे वडीलांना समोरून धडक देवून गंभीर जखमी केले. जखमी यांना उपचाराकरीता उप जिल्हा रूग्णालय कामठी येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान फिर्यादीचे वडीलांना डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले.
याप्रकरणी फिर्यादी दिलीप बांगोजी मते, वय ५२ वर्षे, रा. परमात्मा एक नगर, भिलगाव, नागपूर यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे नविन कामठी येथे सपोनि राजकिरण यांनी वाहन चालकाविरूध्द कलम २८१, १०६(१) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.