घातक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- लकडगंज पोलीसांचे पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारावे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहिती मिळाली की, आंबेडकर चौक, नागपूर नागरीक सहकारी बँके जवळ, नागपूर येथे एक आकाशी रंगाचा शर्ट व निळा जिन्स पॅन्ट घातलेला ईसम शस्त्रासह गुन्हया करण्याच्या बेतात आहे. अशा माहितीवरून नमुद ठिकाणी गेले असता, मिळालेल्या वर्णनाचा इसम हा पोलीसांना पाहुन पळुन जात असता, त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव सोनू उर्फ खल्ला गणेश सहारे, वय २८ वर्षे, रा. प्लॉट नं. १४०, देशपांडे ले-आउट, मस्जिद जवळ, नंदनवन, नागपुर असे सांगीतले. नमुद ईसमाची अंगझडती घेतली असता त्याचे जिन्स पॅन्टचे आत कमरेत एक धारदार लोखंडी चाकु किंमती २००/- रू. चा मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपी हा कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उ‌द्देशाने शस्वासह समक्ष मिळुन आल्याने तसेच, त्याने सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने पोहव. अरूण धर्मे यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे लकडगंज येथे पोउपनि, भंडारे यांनी आरोपीविरूध्द कलम ४/२५ भा.ह.का. सहकलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा नोंदवुन, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपूर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, इंड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Mon Mar 10 , 2025
नागपूर :- दिनांक ०९.०३.२०२५ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये १२ केसेस तसेच एन.डी.पी.एस कायद्यान्वये ०२ केसेस असे एकुण १४ केसेसमध्ये एकुण १४ ईसमावर कारवाई करून रू. १५,०४०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ०१ केसेसमध्ये एकुण ०२ ईसमावर कारवाई करून रू. १,३७,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!