प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तरुणांना आवाहन

नागपूर :- शिक्षण क्षेत्रावर होणारा खर्च ही भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली गुंतवणुक आहे. त्यामुळे तरुणांना प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) तरुणांना केले.

मिहान येथील सिटी प्रमियर कॉलेजमध्ये आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी खासदार  अजय संचेती, मोहन गंधे, मुकुंद देशपांडे, भाजप नेते संजय भेंडे, जयप्रकाश गुप्ता, जयंत खळतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील तरुणांनी मतदार नोंदणीच्या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल ना. गडकरी यांनी अभिनंदन केले.

आपले एक मत देशाच्या भविष्याची दिशा निश्चित करणारे असते. त्यामुळे तरुणांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी पुढे येऊन इतरांनाही प्रेरित करावे, असे आवाहनही ना. गडकरी यांनी केले. ना. नितीन गडकरी म्हणाले, ‘मतदान करणे हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही आपल्या देशात आहे. त्यामुळेच आपण आपला अधिकार बजावून योग्य व्यक्तीला निवडून देण्याचे काम करीत असतो.’ ‘नागपूर व विदर्भातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने मिहान सुरू करण्यात आले. जगातील पाच मोठ्या आयटी कंपन्या आज मिहानमध्ये आहेत. त्यामुळे व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षणावर भर दिल्यास तरुणांना रोजगाराचे दालन खुले होईल.’

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गादा गावातुन बैलजोडीला लागणारे लोखंडी कल्टीवेटर चोरीला

Sun Mar 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा गावातील एका शेतकऱ्याच्या घरातून शेती कामात उपयोगी येत असलेले बैलजोडीला लागणारे लोखंडी कल्टीवेटर अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याची घटना काल दिवसाढवळ्या 5 दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी हेमराज गोरले वय 55 वर्षे रा गादा कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com