नागपूर :-पोलीस ठाणे कळमना हद्दीत मौजा भरतवाडा, पहन १७, शेत क. ५३, ५४, मधिल शिवनेरी हाऊसिंग एजेन्सी चा प्लॉट नं. ५८, एकुण क्षेत्रफळ १९५३ चौरस फुट हा प्लॉट फिर्यादीचे वडीलांनी सन १९९० मध्ये खरेदी केलेला होता. दिनांक ०३.०९.२०१८ ते दि. २२.०२.२०२४ दरम्यान आरोपी क. १) ज्ञानेश्वर वासुदेवराव लांजेवार वय ४९ वर्ष रा. विनोबाभावे नगर, पारडी, नागपुर २) मधुकर महादेवराव मानकर वय ६२ वर्ष रा. प्लॉट ३, भरतवाडा रोड, कळमणा, नागपूर यांनी संगणमत करून फिर्यादीचे वडीलांनी घेतलेल्या प्लॉट ने खोटे व बनावटी कागदपत्रे तयार केली व नमुद प्लॉट हा त्यांचे मालकीचा आहे असे भासवुन तो प्लॉट दुसऱ्या इसमाला विकी करून कब्जापत्र व हमीपत्र लिहुन दिले. आरोपींनी फिर्यादीचा विश्वासघात करून फि. चे प्लॉटचे बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉटची विकी करून फिर्यादीची एकुण १८,००,०००/- रु. ची फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी राजेश सुधाकरराव शेरेकर वय ४२ वर्ष रा. मुंशी मंदीरजवळ, डोंडा चौक, महाल, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कळमना येथे पोउपनि. मोरे यांनी आरोपीविरूध्द कलम ४०६, ४२०, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.