नागपूर :- सदर पोलीसांचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून, गड्डीगोदाम, मस्जिद जवळील, कार्पोरेशन लाल शाळेच्या आतील एका रूम मध्ये रेड कारवाई करून पंचासमक्ष पाहणी केली असता, नमुद ठिकाणी एकुण १० जिवंत गोवंशीय जनावरे यांना अवैधरित्या कत्तलीकरीता निदर्यतेने बांधुन, कोंबुन ठेवल्याचे दिसुन आले, विचारपुस केली असता कोणीतरी अज्ञात आरोपी याने नमुद गोवशीय जनावरे यांना कत्तलीकरीता निदर्यतेने बांधुन, कोंबुन ठेवल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळावरून एकुण १० गोवंशीय जनावरे एकुण किंमती अंदाजे १,००,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमुद जनावरे यांना धंतोली गौरक्षण, वर्धा रोड, नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी फिर्यादी पोहवा, दुर्गेश ठाकुर, पोलीस ठाणे सदर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सदर येथे सपोनि. राठोड यांनी आरोपीविरूध्द कलम ५, ५(व), ९, ९(३) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम-१९७६, सुधारणा कायदा १९९५, सहकलम ३, १११) प्राणी कुरता अधिनियम-१९६०, सहकलम ११८, ११९ म.पो.का अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.