नागपूर :- फिर्यादी खेमबंद जगतराम शाहु वय ४५ वर्ष रा. धरमनगर, किर्तीधर ले-आउट, कळमणा, नागपुर यांनी त्यांची सलेंडर मोटरसायकल क. एम.एच ३१ डी.एन. ४५३६ किंमती अंदाजे २५,०००/- रू. ची पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत पोलीस लाईन टाकळी, शिवाजी स्टेडियम समोर ऊभी करून, रोडचे बाजुला नाश्ता करण्याकरीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची मोटरसायकल चोरून नेली, फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासादरम्यान गिट्टीखदान पोलीसांनी तांत्रीक तपास करून मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून आरोपी गंगानगर, मोकळे मैदानाजवळ एका स्प्लेंडर मोटरसायकलवर बसलेल्या ईसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रवेश कन्हैयालाल कंगाले वय ३७ वर्षे, रा. श्रीराम नगर, उदयनगर चौक, हुडकेश्वर, नागपूर असे सांगीतले. त्याचे जवळील मोटरसायकल वावत सखोल विचारपूस केली असता त्याने वर नमुद वाहन चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीची अधिक सखोल विचारपूस केली असता त्यांनी या गुन्हयाव्यतीरिक्त पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीतुनबालोद्यान, सेमेनरी हिल्स येथुन हिरो होन्डा पेंशन प्रो मोटरसायकल क. एम.एच ४० ए.एफ ९४७५ किंमती २५,०००/- रू. ची चोरी केल्याची तसेच पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीतुन सिताबर्डी उड्डानपूला खालून हिरो होन्डा पॅशन मोटरसायकल क्र. एम. एच ४० ए.ई १८८५ किंमती २५,०००/- रू. ची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीचे ०२ वाहने सि.पी.डब्लू.डी कॉलोनी, काटोल रोड येथे लपवुन ठेवल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन एकुण ०३ वाहने एकुण किंमती ७५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, प्रमोद शेवाळे अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग) नागपुर शहर, राहुल मदने, पोलीस उप आयुक्त (परि. क. २), सुनिता मेश्राम, सहा. पोलीस आयुक्त (सदर विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, कैलास देशमाने, सपोनि. चेतन बोरखडे, पोउपनि. विनोद खाडे, पोहवा, बलजीत ठाकुर, अजय यादव, नापोअं. विशाल नदिकर, आकाश लोथे, सचिन खडसे, विजय तिवारी व नागनाथ यांनी केली.