विभागीय आयुक्तांच्या हस्ते यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार वितरण

– ग्रामीण विकासात यशवंत पंचायत राज अभियानाचा मोठा हातभार – विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर

नवी मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामीण भागाचा विकास, गावांमध्ये पायाभूत सुविधा पुरवणे, ग्रामीण क्षेत्राशी निगडीत कायदे करणे हे ग्रामीण विकास व पंचायत राज विभागामार्फत केले जाते. या विभागाअंतर्गत यशवंत पंचायत राज अभियान राबविले जाते. या अभियानाच्या मोठया हातभारानेच ग्रामीण भागाचा विकास होतो असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज येथे केले.

कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृहात ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत यशवंत पंचायत राज अभियान सन 2020-2021 व 2022 – 2023 पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ.कल्याणकर बोलत होते. कार्यक्रमास मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानूदास पालवे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव यांच्यासह मंत्रालयातील तसेच कोकण विभागातील जिल्हा परिषद ,पंचायत समितीचे पुरस्कारप्राप्त अधिकारी- कर्मचारी मोठया संख्येने उपस्थिती होते.

महाराष्ट्राचा विकास पंचायत राजच्या सहकार्याने होते असे सांगून डॉ.कल्याणकर म्हणाले की .पंचायत समिती, जिल्हा परिषदेला आपण “मिनी मंत्रालय” म्हणतो राज्यातील विकासाला पुरक पंचायत राज, जिल्हा परिषदेचे कार्य असते. ग्रामीण स्तरावरील पंचायत समितीद्वारेच विविध योजनेचे उदिष्ट साध्य होत असते. आणि चांगल्या योजनाचे अनुकरण इतर जिल्हयात देखिल केले जाते. यावर्षी ‘मेरी माटी मेरा देश’ ‘माझी वसुंधरा’ या सारख्या विविध कार्यक्रम राज्यात राबविले गेले. सिंधुदुर्ग आणि कुडाळ या जिल्हयाने यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार पटकावला तर घरकुल योजनेत सिंधुदुर्ग् अव्वल स्थानी राहिले या बद्दल त्याचे अभिनंदन करत पुढील वर्षी या अभियानात जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थेने सहभाग घ्यावा असे आवाहन देखिल यावेळी डॉ.कल्याणकर यांनी केले.

पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला त्यांची नावे पुढील प्रमाणे यशंवत पंचायत राज अभियान सन 2020-2021 राज्य पुरस्कार पंचायत समिती ,कुडाळ ,जिल्हा सिंधुदुर्ग प्रथम, रु.20 लाख, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तृतीय रु.17 लाख, विभागस्तर पुरस्कार, पंचायत समिती कुडळा, जिल्हा सिंधुदुर्ग प्रथम रु.11 लाख, पंचायत समिती मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग द्वितीय रु.8 लाख, पंचायत समिती सुधागड- पाली, जिल्हा रायगड तृतीय रु. 6 लाख, सन 2022-23 विभागस्तर पुरस्कार पंचायत समिती संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी प्रथम रु.11 लाख, पंचायत समिती मालवण, जि.सिंधुदुर्ग द्वितीय रु.8 लाख, पंचायत समिती, शहापूर जि.ठाणे तृतीय रु.6 लाख, तर सन 2019-2020 मध्ये गुणवंत अधिकारी/ कर्मचारी सं.ना.भंडारकर कक्ष अधिकारी, मंत्रालय (खुद्द), शं.शा.यादव, कक्ष अधिकारी, मंत्रालय (खुद्द), स.म.सावंत, सहायक कक्ष अधिकारी, मंत्रालय (खुद्द), सन 2020-21 मध्ये राजाराम दिघे, संचालक राज्य व्यवस्थसापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य, प.वि.बाबर,अवर सचिव, मंत्रालय (खुद्द), आदी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देश के निर्माण में, चंद्रपूर मैदान में’ - कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार

Tue Mar 5 , 2024
– लक्ष्‍मी म‍ित्‍तल ग्रुपसह 19 सामंजस्‍य करारांवर झाल्‍या स्‍वाक्षरी  – ‘ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे थाटात उद्घाटन चंद्रपूर :- देशाच्‍या विकासात आता चंद्रपूर महत्‍वाची भूमिका निभावणार असून अॅडव्‍हांटेज चंद्रपूरच्‍या माध्‍यमातून लक्ष्‍मी म‍ित्‍तल ग्रुपसह 19 कंपन्यांशी सामंजस्‍य करार केले गेले आहेत. चंद्रपूर प्रशासन या सर्व कंपन्‍यांच्‍या पाठीशी पूर्ण शक्‍तीनिशी उभे राहून केवळ चंद्रपूरच नाही तर देशाच्‍या विकासातही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!