काटोल :- पोलीस स्टेशन काटोल येथील स्टाफ पेट्रोलिंग करित असताना गोपनीय माहिती मिळाली की, काटोल येथील अर्जुननगर येथे आरोपी आकाश नंदकिशोर पाटमासे रा. अर्जुन नगर काटोल हा फिर्यादी मुकेश दिनेश पराये यांचे घरासमोर हातात एक लोखंडी काळसर तलवार घेवुन फिरत होता. आरोपीस काटोल पोलीसांनी ताब्यात घेवुन आरोपीच्या ताब्यातुन एक लोखंडी काळसर तलवार ज्याचा टोकापासुन मुठापर्यंत २३ इंच लांब व मुठ ०५ इंच लांब अशी मुठी पासुन टोकापर्यंत २३ इंच लांब व पायथ्याशी १.५ तसेव मुठीची रूंदी ०९ इंच एका बाजुने धारधार असलेली किंमती १००/- रू वर्णनाची तलवार घटनास्थळी जप्त करण्यात आली. आरोपीविरूद्ध पोस्टे काटोल येथे कलम ४, २५ शस्त्र अधि १९५९ महाराष्ट्र पोलिस अधि. १९५१ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कार्यवाही हर्ष ए पोद्दार पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे काटोल येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम, पोहवा कैलास उईके, प्रभुदास दलाल, पोशि दशरथ पवार, चालक योगेश पराची यांनी पार पाडली.