देश के निर्माण में, चंद्रपूर मैदान में’ – कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार

– लक्ष्‍मी म‍ित्‍तल ग्रुपसह 19 सामंजस्‍य करारांवर झाल्‍या स्‍वाक्षरी 

– ‘ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे थाटात उद्घाटन

चंद्रपूर :- देशाच्‍या विकासात आता चंद्रपूर महत्‍वाची भूमिका निभावणार असून अॅडव्‍हांटेज चंद्रपूरच्‍या माध्‍यमातून लक्ष्‍मी म‍ित्‍तल ग्रुपसह 19 कंपन्यांशी सामंजस्‍य करार केले गेले आहेत. चंद्रपूर प्रशासन या सर्व कंपन्‍यांच्‍या पाठीशी पूर्ण शक्‍तीनिशी उभे राहून केवळ चंद्रपूरच नाही तर देशाच्‍या विकासातही हातभार लावेल असे म्‍हणत वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय कॅबिनेट मंत्री, महाराष्‍ट्र सरकार तसेच, चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘देश के निर्माण में चंद्रपूर मैदान में’ अशी घोषणा केली.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर व असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 – इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे सोमवारी थाटात उद्घाटन झाले. चंद्रपूर फॉरेस्ट ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट (वन अकादमी) येथील विद्युत हॉलमध्‍ये झालेल्‍या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला कौशल्‍य विकास व उद्योजकता कॅबिनेट मंत्री, महाराष्‍ट्र सरकार, मंगलप्रभात लोढा यांच्‍यासह आमदार किशोर जोरगेवार, न्‍यू ईरा व्‍यवस्‍थापकीय संचालक बाळासाहेब दराडे, लॉईडचे मधूर गुप्‍ता, कुमार वार, राकेश प्रसाद, राजेश झंझाड, जी. डी. कामडे, आलोक मेहता, के. जी. खुबाटा, मधुसूदन रुंगटा, चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी विनय गौडा, सीईओ विवेक जॉन्‍सन, मनपा आयुक्‍त विपीन पालिवाल यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती.

दीपप्रज्‍वलन, राज्‍यगीत व अॅडव्‍हांटेज विदर्भवरील चि‍त्रफितीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासासाठी व स्‍वावलंबी होण्‍यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी आयोजित केलेल्‍या ‘अॅडव्‍हांटेज चंद्रपूर’ला उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी शुभेच्‍छा दिल्‍या.

मंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, चंद्रपूर हे आतापर्यंत कोल, सिमेंट यासाठी ओळखले जात होते आता ते ‘कॅश’ साठी पण ओळखले जाईल. येथे स्‍थापन झालेले उदयोग भविष्‍यात भरपूर पैसा कमावतील. करार झालेल्‍या कंपन्‍यांच्‍या विविध परवानगींसाठी ‘वन विंडो सिस्‍टीम’ तयार करण्‍यासोबतच एअरपोर्ट, रेल्‍वे, रस्‍ते आदी पायाभूत सुविधा, कौशल्‍य विकासाचे विविध अभ्‍यासक्रम, संशोधन कार्यक्रमांवर भर दिला जाणार असल्‍याचे ते यावेळी म्‍हणाले.

मंगलप्रभात लोढा यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्‍या कार्याचे कौतुक केले. हे ‘अॅडव्‍हांटेज चंद्रपूर’ नसून ‘अॅडव्‍हांटेज सुधीर मुनगंटीवार’ आहे. चंद्रपूरला गोल्‍डमाईन बनण्‍याची त्‍यांच्‍यात क्षमता आहे, असे ते म्‍हणाले. आ. क‍िशोर जोरगेवार यांनी यावेळी शुभेच्‍छा दिल्‍या.

विवेक जॉन्‍सन यांनी अॅडव्‍हांटेज विदर्भ व चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी जिल्‍हा प्रशासनाने विविध कंपन्‍यांशी केलेल्‍या सामंजस्‍य करारासंदर्भात माहिती सांगितली. विनय गौडा यांनी चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या सामाजिक, औद्योग‍िक व आर्थिक विकासाबद्दल विस्‍तृत सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व श्‍यामल देशमुख यांनी केले.

सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्‍या ‘अॅडव्‍हांटेज चंद्रपूर 2024’ ला उद्योग मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि एमएसएमई मंत्रालय, भारत सरकारचे सहकार्य लाभले आहे.

50 वर्षांचे व्हिजन तयार करा – नितीन गडकरी

चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या क्षमता आणि कमतरता या बाबींचा विचार करून या जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी, जिल्‍ह्याला समृद्ध व संपन्‍न करण्‍यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी 50 वर्षांचे व्हिजन तयार करावे, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ संदेशातून केल्‍या. चंद्रपूरमध्‍ये अॅडव्‍हेंचर स्‍पोर्ट्स, वॉटर स्‍पोर्टस, पर्यटन, पर्यटकांसाठी इलेक्‍ट्रीक गाड्या, रिसॉर्टस, बांबू लागवड, मत्‍स्‍यव्‍यवसाय यावर काम करण्‍याची गरज असल्‍याचे ते म्हणाले.

चंद्रपूरमध्‍ये स्‍टील प्‍लांट उभारणार – अलोककुमार मेहता

लक्ष्‍मी म‍ित्‍तल ग्रुपचे संचालक मायनिंग अँड स्‍ट्रॅटेजिक प्रोजेक्‍ट अलोक कुमार मेहता यांनी महाराष्‍ट्रात येऊन सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी करण्‍याची संधी म‍िळाल्‍याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांचे धन्‍यवाद व्‍यक्‍त केले. चंद्रपूरमध्‍ये 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून स्‍टील प्‍लांट स्‍थापन करण्‍यात येणार असून त्‍यामाध्‍यमातून 60 हजार प्रत्‍यक्ष अप्रत्‍यक्ष रोजगार निर्मिती केली जाईल, असे ते म्‍हणाले. मधुसूदन रुंघटा यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.

19 सामंजस्‍य करार, 75 हजार 721 कोटींची गुंतवणूक

‘अॅडव्‍हांटेज चंद्रपूर’च्‍या उद्घाटन सत्रात लक्ष्‍मी म‍ित्‍तल ग्रुपसह एकुण 19 सामंजस्‍य करार करण्‍यात आले. या सुमारे 75 हजार 721 कोटी रुपयांच्‍या करार करण्‍यात आले ज्‍या द्वारे भागात 50 हजारहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे. जिल्‍हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने या करारावर स्‍वाक्षरी केले. या विविध करारांवर आर्सेलर म‍ित्‍तल निप्‍पॉन स्‍टील इंडिया लिमिटेडचे अलोककुमार मेहता, न्‍यू ईराचे व्‍यवस्‍थापकीय संचालक बाळासाहेब दराडे , लॉईड मेटल्‍सचे मधूर गुप्‍ता, चंद्रपूर सोलारचे राजेश ओसवाल, अंबुजा सिमेंट के सुब्‍बुलक्ष्‍मणन, अरविंदो रिअॅलिटी इन्‍फ्रोस्‍ट्रक्‍चर प्रा. लि. संजय म‍िश्रा, राजुरी स्‍ट्रील्‍सचे विपीन जैन व विवेक गुप्‍ता, सनफ्लॅग अँड स्‍टील कंपनी लिमिटेडचे एस. महादेवन अय्यर, अल्‍फालॉजिक टेक्‍सेस लिमिटेडचे अंशु गोयल, वेस्‍टर्न कोलफिल्‍ड लिमिटेड हर्षल दातार, अल्‍ट्राटेक एसीसीचे अतुल कंसन, डेस्टीनो म‍िनरल्‍सचे मोरेश्‍वर झोडे, एसआयएडी युएसएचे उमेश दिघे व अनंत एव्हियेशनचे संचालक यांनी स्‍वाक्षरी केल्‍या.

भव्‍य प्रदर्शनीचे उद्घाटन

मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यावेळी भव्‍य प्रदर्शनीचे उद्घाटन करण्‍यात आले. या प्रदर्शनीमध्‍ये कोल माईन्स, म‍िनरल्‍स, स्‍टील, बाम्‍बू, फिशरीज, टुरिजम के साथ साथ, लॉजिस्टिकस, डेअर, ग्रीन एनर्जी, रियल एस्टेट, ऑटोमोबाईल, फार्मास्यूटिकल्स अशा विविध क्षेत्राशी संबंधित सुमारे 150 स्‍टॉल्‍स आहेत. मान्‍यवरांनी यावेळी या प्रदर्शनीची पाहणी केली कौतुक केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Aditya Thackeray, again the same mistake?

Tue Mar 5 , 2024
My dear Aditya, again the same mistake? Just last week when the interim budget session was going on, I heard a new batch of Yuva Sena functionaries was selected. And guess what? I see you have followed the same pattern, which has led to this whole downfall of the entire Shivsena in the past! Yes, it was first in the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!