120 लिटर मद्यसार स्पिरिट जप्त..

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी 

36 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी ता प्र 15 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बजरंग पार्क येथे एका कुलूपबंद घरी अवैधरित्या मद्यसार युक्त पदार्थ स्पिरिट लपवून ठेवलेल्या ठिकाणी जुनी कामठी पोलिसांनी धाड घालण्याची यशस्वी कारवाही आज दुपारी दीड दरम्यान केली असून या धाडीतून 120 लिटर स्पिरिट किमती 36 हजार रुपये व इतर साहित्य किमती 470 रुपये असा एकूण 36 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनास्थळीस मीर अली हैदर अली यांच्या घरी अवैध स्वरूपाने मद्यसार पदार्थ लपवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी सापळा रचून धाड घातली असता तीन प्लास्टिक ड्रम मध्ये 120 लिटर स्पिरिट किमती अंदाजे 36 हजार रुपये,व इतर साहित्य किमती 470 रुपये असा एकूण 36 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Every child can become an Engineer or a Doctor….

Fri Dec 16 , 2022
Coaching CARTEL- PART 1 Nagpur – As parents we all want that our child should make the best out of their life and that we think can be achieved with a proper and formal education no matter what ever it costs, never ever considering whether is it actually worth spending on those so-called foundation courses offered by numerous coaching/preparation institutes […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com