संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी 18 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर कामठी विधानसभा मतदार संघात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.रामटेक लोकसभा निवडणूक ही पहिल्याच टप्प्यात होणार असून 20 मार्च पासून नामनिर्देशन पत्र घेणे /स्वीकारणे सुरू होणार आहे तेव्हा प्रत्येकाने निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश आचार संहिता प्रमुख संदीप बोरकर यांनी केले आहे.
19 एप्रिल 2024 रोजा होणाऱ्या रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी कामठी विधानसभा सज्ज निवडणूक विभाग पूर्णपणे सज्ज आहे.रामटेक लोकसभा मतदार संघ अंतर्गत सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे ज्यामध्ये काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड,कामठी व रामटेक चा समावेश आहे हे सहाही विधानसभा मतदार संघातील एकूण मतदार संख्या ही 20 लक्ष 46 हजार 435 आहे त्यात कामठी विधानसभा मतदार संघात 4 लक्ष 65 हजार 399 मतदारांचा समावेश आहे.त्यात 2 लक्ष 35 हजार 71 पुरुष,2 लक्ष 30 हजार 313 स्त्री मतदार तर 15 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.