प्रवाशांचे मोबाईल चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

– मेलवर आलेल्या तक्रारीची तत्काळ दखल

– सहा मोबाईल जप्त, मुळ मालकांचा शोध

नागपूर :- गोपनिय माहितीच्या आधारे रेल्वेत चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून वेगवेगळ्या गाड्यातील प्रवाशांचे चोरी केलेले 6 मोबाईल जप्त करण्यात आले. रामू यादव (45) रा. भाटापारा, तिलदार असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिस जप्त केलेल्या मोबाईल धारक मालकाशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात आहेत. आरोपीने आता पर्यंत कीती प्रवाशांचे मोबाईल चोरले याचा तपास सुरू आहे.

दुर्ग येथील रहिवासी फिर्यादी साहिल झाडे (19) हा 20844 भगत की कोठी एक्सप्रेसने जयपूर ते दुर्ग (कोच बी-5, बर्थ – 55) असा प्रवास करीत होता. पहाटेच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी थांबली. साहिल साखर झोपेत असताना आरोपीने निळ्या लाल रंगाची कॉलेज बॅग पळविली. बॅगमध्ये लॅपटॉप, चार्जर, आधार, पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसंन्स, एटीएम कार्ड, मोबाईल चार्जर, टेबल टेनिस रॅकेट आदी 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल होता.

साहिलच्या लक्षात येताच त्यांनी लोहमार्ग नागपूर पोलिस ठाण्यात मेलवर तक्रार केली. पोलिसांनी लगेच मेलची दखल घेत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तत्पूर्वी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनिय माहितीच्या आधारे आरोपीचे लोकेशन मिळविले. तो शुक्रवारी तलाव परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिस हवालदार पुष्पराज मिश्रा, प्रवीण खवसे, मजहर अली, अमित व्दिवेदी यांनी शुक्रवार तलाव परिसरात आरोपीचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. आरोपी पुन्हा चोरी करण्याच्या उद्देशाने नागपूर रेल्वे स्थानकावर आला. तो पूर्व प्रवेशव्दार संत्रामार्केट परिसरात असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली. पथकाने घेराव करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून एक लाख 32 हजार रुपये किंमतीचे 6 मोबाईल जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इनोवेटिव एंजियोप्लास्टी - डॉ. नितिन तिवारी द्वारा मध्य भारत में एक और पहली बार

Mon Nov 13 , 2023
नागपूर :- मध्य भारत के अग्रणी स्वास्थ्य सेवा अस्पताल, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपुर ने 69 वर्षीय पुरुष मरीज पर अपनी तरह की पहली इनोवेटिव एंजियोप्लास्टी कर मरीज की जान बचाकर एक बार फिर खुद को साबित किया है। एक 69 वर्षीय उच्च रक्तचाप से ग्रस्त, मधुमेह से पीड़ित सज्जन, जिन्हें दिल का दौरा पड़ा था, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपुर में आए और […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com