संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम दरवर्षी राबविण्यात येते .भारतामध्ये 13 जानेवारी नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळुन आलेला नाही असे मौलिक मत अंगणवाडी सेविका सुषमा खोब्रागडे यांनी पल्स पोलिओ लसीकरण केंद्रावर व्यक्त केले.
यानुसार आज कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भाग व कामठी छावणी परिषद भागातील एकूण 200 च्या वर बूथ वर पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आले.या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून एकूण 200 च्या वर पल्स पोलिओ बुथवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 0 ते 5 वर्षे वयोगटातील 15 च्या जवळपास बालकांना पल्स पोलिओ लसीकरण चे डोज पाजण्यात आले.या पल्स पोलिओ मोहिमेत एकूण 200 च्या वरील केंद्रासह मोबाईल वैन, ट्रांजिस्टर बूथ यासह रेल्वे स्टेशन,बस स्थानक,पंचायत समिती ,पोलीस स्टेशन आदी ठिकाणी पल्स पोलिओ लसीकरण केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती.