जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त भारताने आपले आंतरराष्ट्रीय सहकार्य केले अधोरेखित

नवी दिल्ली :- जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनाच्या पूर्वसंध्येला, भारत आपल्या नागरिकांना सक्षम बनवण्याचा आणि जागतिक नेतृत्व स्वीकारण्याचा आपला असाधारण डिजिटल प्रवास अभिमानाने साजरा करत आहे.

भारतीय दूरसंचार क्षेत्राने अलिकडच्या वर्षांत महत्त्वपूर्ण घडामोडी पाहिल्या आहेत. या घडामोडींनी परिवर्तनशील युगाचा टप्पा निश्चित केला आहे. अभूतपूर्व डेटा वापर, विपुल वापरकर्ता आधार आणि धोरण-अनुकूल वातावरण यामुळे भारताने उद्योग वाढ आणि स्टार्ट-अप नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे सुरू ठेवले आहे. आज भारतात 4G मध्ये 99% कव्हरेज फूटप्रिंट आहे आणि 4G मध्ये 6 लाखांहून अधिक खेडी आणि सुमारे 4.42 लाख 5G बेस स्टेशन ट्रान्सीव्हर आहेत.

जागतिक संपर्क वाढवण्यासाठी तसेच डिजिटल नवोन्मेष आणि पायाभूत सुविधांमध्ये भारताला जागतिक नेतृत्व म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी जागतिक दर्जाची दूरसंचार परिसंस्था तयार करण्याच्या दृष्टीने दूरसंचार मंत्रालय धोरणात्मक आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि सहयोग स्थापित करत आहे. दूरसंचार मुत्सद्देगिरी धोरणाने नवीन व्यावसायिक उपक्रमांना आकर्षित करण्यात, जागतिक नेत्यांसोबत भागीदारी करण्यासाठी, देशांतर्गत स्टार्टअप्सना प्रोत्साहित करण्यात, नवोन्मेषाला चालना देण्याप्रति भारताची वचनबद्धता प्रदर्शित करण्यात आणि जागतिक दूरसंचार परिदृश्यात आपले नेतृत्व स्थान सुरक्षित ठेवण्यात मदत केली आहे. दूरसंचार मुत्सद्देगिरी धोरण फलनिष्पत्तीवर केंद्रित असून बऱ्याच नवीन गोष्टी साध्य होत असल्याचे दिसून येत आहे.

धोरणात्मक भागीदारी करण्यासाठी भारताने भागीदार देश, दूरसंचार चिप कंपन्या आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांशी हातमिळवणी केली आहे. 23 सप्टेंबर आणि 24 जानेवारीच्या अमेरिका भेटी दरम्यान, मुक्त RAN स्विकार आणि विश्वासू पुरवठादारांमधील परस्पर विश्वास वाढवण्यासाठी ‘भारत-अमेरिका मुक्त RAN मान्यता आराखडा’ औपचारिकरित्या तयार करण्यात आला.

2025 पर्यंत जागतिक मोबाईल वर्ल्ड परिषद प्रमाणे IMC ला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एकात्मिक विपणन संप्रेषणाद्वारे महत्त्वपूर्ण प्रयत्न केले गेले. यामुळे आंतरराष्ट्रीय सहभाग आणि परदेशी गुंतवणूक भारताकडे आकर्षित करून भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

दूरसंचार मंत्रालयाने शिकागो विद्यापीठासोबत Quantum Networks आणि Quantum Teleportation मध्ये संशोधन आणि विकास वाढवण्यासाठी, नवोन्मेष वाढवण्यासाठी आणि भारतात क्वांटम कम्युनिकेशन्समध्ये स्टार्टअप परिसंस्था मजबूत करण्यासाठी संभाव्य सहकार्यांचा शोध घेतला. तसेच अमेरिका आणि भारत यांच्यातील क्वांटम टेलिपोर्टेशन लिंकची चाचपणी केली जात आहे.

या असामान्य प्रयत्नांमुळे देशाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेतृत्त्व बनवण्यात,निर्यात सुधारण्यात, प्रगत देशांशी संबंध निर्माण करण्यात, सर्वोत्तम पद्धतींमधून शिकण्यात आणि विश्वासार्ह भागीदार देशांकडून विशेष ज्ञान मिळवण्यात यश आले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बनावट कॉल्स -दूरसंचार विभाग/ट्रायकडून तुमची मोबाईल सेवा खंडित करण्याचे इशारे देणारे कोणतेही कॉल घेऊ नका आणि त्याची www.sancharsaathi.gov.in येथे तक्रार करा

Sat May 18 , 2024
नवी दिल्ली :- दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने नागरिकांना बनावट कॉल्स न घेण्यासाठी एक मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे, ज्या कॉलद्वारे नागरिकांना फोन करणाऱ्यांकडून त्यांचा मोबाईल क्रमांक खंडित करण्याचा किंवा त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा इतर कोणत्यातरी अवैध कृत्यांसाठी वापर केला जात असल्याचा इशारा दिला जातो. आपण सरकारी अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या आणि लोकांना फसवणाऱ्या परदेशी मूळ स्थान असलेल्या मोबाईल क्रमांकांवरून(+92-xxxxxxxxxx यांसारख्या) येणाऱ्या व्हॉटसऍप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com