वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

– गुन्हेशाखा सामाजीक सुरक्षा विभाग पोलीसांची कामगिरी 

नागपूर :- दिनांक ३०.०४.२०२४ चे २३.०० वा. ते दि. ०१.०५.२०२४ चे ०८.०० वा. से दरम्यान, फिर्यादी हितेश राजेन्द्र वानखेडे वय २१ वर्ष रा. प्लॉट नं. १. अहील्या नगर, जयताळा रोड, नागपूर यांनी त्यांची मोपेड अॅक्टीव्हा क. एम.एच ३१ ई.डब्लू ०८४६ किंमती एकूण ४०,०००/- रू ची ही पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीत वानखेडे ज्वेलर्स समोर, जयताळा, नागपूर येथे लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे एम.आय.डी.सी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हेशाखा सामाजीक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, त्यांनी सापळा रचुन आरोपी १) प्रज्वल संजय पाटील, वय २५ वर्षे रा. दव्हा, ता. उमरेड, जि. नागपूर २) शुभम बापू चौधरी वय २७ वर्ष रा. पांढराबोडी, संजय नगर, अंबाझरी, नागपूर व त्यांचे दोन साथिदार विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचे साथिदार पाहिजे आरोपी १) सर्वेश उर्फ टिटू चंद्रशेखर परिहार रा. संजय नगर, पांढराबोडी, नागपूर यांचे सोवत संगणमत करून वर नमुद गुन्हयातील वाहन चोरीची कबुली दिली. आरोपींची अधिक चौकशी केली असता, त्यांनी पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीतुन पुन्हा एक मैटालीक ग्रे रंगाची अॅक्टीव्हा क. एम.एच ४० बी.एम २०९२ किंमती ७०,०००/- रू. बोरी केल्याची तसेच पोलीस ठाणे कोतवाली हद्दीतुन काळया रंगाची अॅक्टीव्हा गाडी क. एम. एच ४९ ए. डोंड २८१३ किंमती ७०,०००/- रू, ची असे एकुण ०३ वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींचे ताब्यातुन गुन्हयातील चौरी केलेले वाहने एकुण किंमती १,८०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी एम.आय.डी.सी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.

वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, पोलीस सह. आयुक्त साहेब नागपूर शहर, मा. पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शखाली, मपोनि, कविता ईसारकर, पोहवा, सचिन बडीये, नापोअं. शेषराव राउत, पोअं. कुणाल मसराम, अश्विन मांग, समीर शेख, नितीन वासने, मपोअं. पुनम शेंडे व आरती यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जाळपोळ तसेच खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपींना अटक

Sat May 18 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे धंतोली हद्दीत फुल मार्केट, जानकी कॉम्प्लेक्स जवळ, राहणारे फिर्यादी नामे वेदांत विकास ढाकुलकर, वय २४ वर्ष, हे घरी हजर असतांना आरोपी १) मृणाल मयूर गजभिये वय २८ वर्ष रा. आनंद नगर, सिताबर्डी, नागपूर २) अमन अनिल मेश्राम वय २९ वर्ष रा. सोमवारी क्वॉर्टर, सक्करदरा, नागपूर ३) निखील संतोष सावडीया वय २४ वर्ष रा. टेकडी लाईन, सिताबर्डी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com