संदीप बलवीर, प्रतिनिधी
#तीन महिन्यांचा वेतन व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी
#पोलीस प्रशासनाने कामगारांचे विष प्राषण आंदोलन पाडले हाणून
#पोलिसांचा लाटीचार्ज,तर कामगारांची दगडफेक
#पोलीस उपनिरीक्षकासह काही कामगार ही जखमी
नागपूर :- बुटीबोरी औधोगिक क्षेत्रातील कपडा उत्पादन करणाऱ्या मोरारजी टेक्सटाईल कंपनीच्या कामगारांनी व्यवस्थापनाच्या विरोधात तीन महिन्यांचे वेतन व काही प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकरीता आज दि 08 मे ला कंपनीतील पाण्याच्या टाकीवर चडून विरुगिरी आंदोलन सुरु केले.
मोराराजी टेक्सटाईल्स कंपनी व्यवस्थापणाने कंपनीतील 2000 स्थायी व आस्थायी कामगारांचा तीन महिन्यांचा पगार, दिवाळी बोनस, ले ऑफ चे वेतन व 26 दिवस काम न देता कामगाराची आर्थिक व मानसीक पिळवणूक करीत असल्यामुळे कामगारांनवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे कामगारांनी चिढुन कंपनी व्यवस्थापणाच्या विरुद्ध दि 17 एप्रिल पासून काम बंद आंदोलन पुकारले होते.
तर या आंदोलनातूनही काहीही मार्ग न निघाल्यामुळे दि 08 मे ला विष प्राषण करून आत्महत्या करण्याचा ईशारा कंपनी व्यवस्थापन, शासन व प्रशासनाला दिला होता. त्या अनुषंगाने कंपनीतील स्थायी व आस्थायी कामगार आज कंपनी प्रवेश द्वारावर एकत्र येऊन कंपनीत प्रवेश करू इच्छित होते.परंतु सकाळी 6:45 वाजता पोलीस प्रशासनाने कामगारांना कंपनी प्रवेश द्वारावरच रोखले. त्यामुळे कामगारांत आक्रोश निर्माण झाला. त्यामुळे काही कामगारानीं कंपनीच्या भिंतीवरून चढून कंपनीच्या आत प्रवेश केला.
कामगारांचा आक्रोश व भिंतीवर चढून आत प्रवेश घेऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने कामगारांवर लाटीचार्ज केला. तर प्रतिउत्तरात कामगारांनी दगडफेक केली. यात काही कामगार जखमी झाले तर बंदोबस्त करण्याकरीता आलेले बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पालीवाल हे जखमी झाले.तर भिंतीवरून चढून कामगार प्रतिनिधिनी कंपनीच्या आत प्रवेश करीत कंपनीतील पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन सुरु केले.
कामगारांनी विष प्राषन करून आत्महत्या करू नये म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर सह बुटीबोरी, उमरेड, कळमेश्वर व नागपूर हेड क्वार्टर येथून पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावून कामगारांचे विष प्राषन आंदोलन पोलीस प्रशासनाने हाणून पाडले.
-मोराराजी टेक्सटाईल्स च्या कामगारांच्या विष प्राषन करून आत्महत्या आंदोलनाला हिंगच्या तहसीलदार प्रियदर्षांनी बोरकर व हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी भेट दिली.यावेळी कामगारांनी सुरु केलेले आंदोलन थांबवावे मी स्वतः मंगळवार दि 9 मे ला नागपूर जिल्हाधिकारी डॉ विपीन इटणकर यांच्याशी बैठक लावून काहीतरी तोडगा काढून देईल असे असे आश्वासन समीर मेघे यांनी कामगारांना दिले. परंतु कामगारांनी त्यांचे काही एक न ऐकता आंदोलन सुरूच ठेवले आहे.
विशेष बाब म्हणजे दि 05 मे ला नागपूर जिल्हाधिकारी डॉ विपीन इटणकर यांच्या कक्षात मोराराजी कंपनीचे व्यवस्थापनातील अधिकारी व कामगार प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली होती. त्या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचा थकीत पगार करून आंदोलनाचा तोडगा काढवा व त्याचा अहवाल सायंकाळी 5 वाजेपर्यंत कामगार आयुक्तन्नी जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन सुद्धा त्यावर कामगार आयुक्त व कंपनी व्यवस्थापन यांनी अंमलबजावणी न केल्याची माहिती कामगार प्रतिनिधिनी दिली.