महावितरणच्या लाईनवुमेन हंसा कुर्वे यांचा दिल्ली येथे गौरव

नागपूर :- वीज वितरण क्षेत्रात लाईनवुमन म्हणून पुरुषांच्या बरोबरीने काम करणा-या हंसा कुर्वे या महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत लष्करीबाग उपविभागाअंतर्गत कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ आणि लष्करीबाग उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमेंद्र गौर यांचा केंद्रीय विद्युत प्राधिकरण आणि टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रीब्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील इंडीया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित लाईनमन दिवस 2024 या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

लाईनवुमेन म्हणुन आपल्या कार्याची छाप पाडणा-या हंसा कुर्वे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमेंद्र गौर यांच्यासह महावितरणच्या कोल्हापूर शहर विभागातील प्रधान तंत्रज्ञ प्रकाश पाटील, छत्रपती संभाजी नगर येथील क्रंतीचौक शाखा कार्यालतील वरिष्ठ तंत्रज्ञ महेशकुमार वडचकर आणि कोकणातील किसान नगर शाखा 3 कार्यालया अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत श्रावणी शेलार यांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला.

भारतात वीज वितरण क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण करणा-या महावितरण कर्मचा-यांनी केलेल्ल्या उल्लेखनिय कामाची पावती म्हणुन हा गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, सिव्हील लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे यांच्यासह महावितरण्च्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सहका-यांनी हंसा कुर्वे आणि हेमेंद्र गौर यांचे अभिनंदन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वनांची सेवा आणि पर्यावरणाचे संरक्षण हे ईश्वरीय कार्य - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Tue Mar 5 , 2024
– ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते वनभवनाच्या इमारतीचे भुमिपूजन चंद्रपूर :- ‘जंगल से जीवन के मंगल तक’ आणि ‘वन से धन तक’ या संकल्पनेवरच वनविभाग काम करीत आहे. वनांची सेवा आणि पर्यावरणाचे संरक्षण हे ईश्वरीय कार्य आहे. त्यामुळे या भवनातून वन संवर्धन आणि वनांची सुरक्षेचे काम होईल, असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. नवीन वनभवन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!