तायक्वाँडो स्पर्धेचे थाटात उद्घाटन, खासदार क्रीडा महोत्सव

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत बुधवारी (ता. १७) विवेकानंद नगर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे तायक्वाँडो स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य भाजपचे उपाध्यक्ष संजय भेडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी स्पोर्ट्स तायक्वाँडो असोसिएशनेचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, इंटरनॅशनल तायक्वाँडो लायसन्स कोच बालाजी जोगदंड, इंडिया तायक्वांडो कोच मुंबईचे विल्सन वोरळीकर, एस. एन. मोर कॉलेज, तुमसरचे प्राचार्य डॉ. चेतनकुमार मसराम, भाजप दक्षिण नागपूरचे अध्यक्ष देवेन दस्तुरे, स्पोर्ट तायक्वांडो असोसिएशनचे सचिव डॉ. संतोष चौधरी, शिवछत्रपती पुरस्कार्थी व खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पियुष आंबुलकर, खासदार क्रीडा महोत्सवाचे सहसंयोजक सचिन माथने, खासदार क्रीडा महोत्सवाचे समन्वयक गजानन निशितकर यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कन्हान येथे शिवसेना (उद्धव ठाकरे) कार्यालयात स्त्री शक्ती संवाद यात्रा शुभारंभ 

Thu Jan 18 , 2024
– न पचणाऱ्यांना जास्त दिलं म्हणुन पचलं नाही : किशोरी  पेडणेकर कन्हान :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेते व माजी महापौर किशोरी पेडणेकर स्त्री शक्ती संवाद यात्रा निमित्त विदर्भ दौऱ्यावर असतांना रामटेक विधानसभेतील कन्हान येथील तारसा रोड कन्हान (उद्धव ठाकरे) शिवसेना पक्ष जनसंपर्क कार्यलयात बुधवार दि. 17 जनवरीला स्त्री शक्ती संवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पेडणेकर यांनी उपस्थित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com